कुंदन पाटील/जळगाव: जिल्हा भूमिअभिलेख विभागाला ५८ रोवर्स युनिट मशिन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेतजमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटपासह जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होत आहे. या रोवर्सच्या मदतीने मोजणी पूर्ण करण्यात जळगावकर आघाडीवर आहेत.या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागत नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार आहे. त्यामुळे अनेक जण रोवर्सची मदत घेताना दिसत आहेत.
यंत्रे उपलब्धसध्या स्थितीला १५ तालुक्यांाठी ५८ रोवर्स मशीन उपलब्ध आहेत. जळगावच्या प्रशासनाला सर्वाधिक रोवर्स मिळाले आहेत. जळगावला ८, भडगाव ३, पाचोरा ४, चाळीसगाव ४, पारोळा ३, एरंडोल ३, धरणगाव ३, अमळनेर ४, चोपडा ३, यावल ४, भुसावळ ३, बोदवड ३, जामनेर ६, मुक्ताईनगर ३ व रावेरला ४ मशिन्स देण्यात आले आहेत.
भुसावळ पिछाडीवररोवर्सच्या मदतीने शेतजमीन मोजणी करण्यात भुसावळ सर्वात मागे आहे. भुसावळकरांनी आतापर्यंत ११६ शेतजमिनींची मेाजणी केली आहे. त्यानंतर भडगावकरांनी १४९ जमिनींची मोजणी केली आहे. जळगावमधील ११६० शेतजमिनींची मोजणी झाली आहे.
तालुकानिहाय मोजणी प्रकरणेजळगाव : ११६०भडगाव : १४९पाचोरा : ५२०चाळीसगाव : ५०६पारोळा : ३२०एरंडोल : ३२५धरणगाव : ४८६अमळनेर : ६७४चोपडा : ५७४यावल : ३९०भुसावळ : ११६बोदवड : २१३जामनेर : ६९०मुक्ताईनगर : ३५५रावेर : ७३९एकूण : ७२१६