वासेफ पटेलभुसावळ : प्रवाशांची वेटिंग लिस्टची डोकेदुखी दूर करण्यासाठी आता मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातून ६ क्लोन ट्रेन धावणार आहेत. पूर्ण गाडी ही थर्ड एसी असेल.कोरोना काळात ठप्प झालेली रेल्वे वाहतूक आता हळूहळू रुळावरून धावत आहे. यासाठी रेल्वेकडून काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांना वेटींग लिस्टमधून मुक्त करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. आता टिकीट बूक करण्यापूर्वी वेटिंग लिस्टचे टेन्शन घ्यायची डोकेदुखी राहणार नाही. प्रवाशांना कन्फर्म सीट देण्याची योजना रेल्वेने तयार केली आहे. जेणेकरून प्रवाशांना वेटिंग तिकीट असले तरी रेल्वेत बसण्यास जागा मिळू शकेल. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ विभागातून ६ क्लोन ट्रेन जाणार आहे.क्लोन ट्रेन आहे तरी काय?क्लोन ट्रेन हे आधीच्या ट्रेनच्या नावाने आणि त्यानुसारच चालतील, ज्या नावाने या ट्रेन सुरू केल्या आहेत त्या रेल्वे मार्गावर धावतील, त्याच मार्गावर क्लोन ट्रेन चालवल्या जातील. काही मार्गावर जादा रेल्वे सोडण्याची मागणी होत असेल तर त्यासाठी या क्लोन ट्रेन सोडल्या जातील. रेल्वेमार्गावर नवीन रेल्वे वाढविण्याऐवजी आधीच असलेल्या रेल्वेच्या नावाने त्याच मार्गावर दुसरी ट्रेन सोडली जाईल. रेल्वेत प्रवाशांना अनेक सुविधा मिळतील. महत्त्वाचे म्हणजे या रेल्वे आधीच्या रेल्वेपेक्षा वेगवान असतील. प्रवासात रेल्वे कमी ठिकाणी थांबेल आणि मूळ रेल्वेच्या वेळेपेक्षा ती लवकर सथनक सोडेल. या ट्रेन त्याच मार्गावर सोडल्या जातील.१० दिवसांपूर्वी सुरू होईल आरक्षणक्लोन ट्रेनसाठी १० दिवस आधीपासूनच आरक्षण सुरू होईल. ज्या प्रवाशांचे तिकिट वेटिंग लिस्टमध्ये आहे ते क्लोन ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील. ज्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेचे वेटिंग लिस्ट खूप जादा आहे त्याच मार्गावर क्लोन ट्रेन चालविण्याचे नियोजन आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विशेष गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट जास्त असेल तर अशा परिस्थितीत आणखी एका ट्रेनची व्यवस्था केली जाईल. क्लोन ट्रेन ही मुख्यत: सुटल्यानंतर अंदाजे एका तासाने धावेल.भुसावळ विभागातून धावणार ६ क्लोन विशेष गाड्याअतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून क्लोन विशेष गाडी ही चालवली जाणार आहे.गाडी क्रमांक ०७३७९ डाऊन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी २५ सप्टेंबर पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहून १२:३० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी ४:२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल.थांबा- शनिवारी मनमाड, भुसावळ (१०:५५/११:००),संरचना- वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणीगाडी क्रमांक ०७३८० अप हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा क्लोन विशेष गाडी २७ सप्टेंबरपासूनपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी प्रस्थान स्टेशनहून दुपारी १ वाजता रवाना होईल आणि तिसºया दिवशी ०४:४५ वाजता वास्को दी गामा स्टेशनला पोहचेल.थांबा- सोमवारी भुसावल ०५:२०/२५, मनमाड पुणे, मीरज, बेलगावी, लोंडा, मडगाव.संरचना- वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणी.गाडी क्रमांक ०६५२३ डाऊन यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी २३ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवार , शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन हुन दुपारी १:५५ वाजता रवाना होईल आणि तिसºया दिवशी दुपारी १:२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल.थांबा- गुरुवारी, रविवारी मनमाड, भुसावळ ५:४५/५०संरचना- वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणी.गाड़ी क्रमांक ०६५२४ अप हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर क्लोन विशेष गाडी ही २६ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी मंगळवारी प्रस्थान स्टेशनहून ०८:४५ वाजता रवाना होईल आणि तिसºया दिवशी ०६:२० वाजता यशवंतपूर स्टेशनला पोहचेल.थांबा- रविवारी, बुधवारी भुसावळ ०१:०५/१०, मनमाड, पुणे, बेलगावी, धारवाड, हुबळी, हावेरी, दवांगेरे, अर्सिकेरे, तुमकुरू.संरचना- वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणी.याशिवाय सुरत-छपरा गाडी क्रमांक ०९०६५ व छपरा-सुरत गाडी क्रमांक ०९०६६ ही गाडीसुद्धा डाऊनमध्ये धावणार आहे.
भुसावळ विभागातून धावणार ६ क्लोन ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:09 PM
प्रवाशांची वेटिंग लिस्टची डोकेदुखी दूर करण्यासाठी आता मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून ६ क्लोन ट्रेन धावणार आहेत.
ठळक मुद्देवेटिंग लिस्टची डोकेदुखी होणार दूर पूर्ण गाडी असेल थर्ड एसी गाडीला थांबे कमी असतील