जळगाव : कोरोनाच्या संकटात सेवा देणारे कोरोना योद्धेही या आजाराच्या विळख्यात येत असल्याचे चित्र असून गेल्या दोन महिन्यात कोविड रुग्णालयातील सहा डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे़ यातील दोघा डॉक्टर्सनी कोरोनावर मात करीत ते कर्तव्यावर परतले आहेत़गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाचा प्रार्दूभाव शहरात सुरू झाला़ तेव्हापासून अनेक यौद्धे अविरत सेवा देत आहेत़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्णत: कोविड रुग्णालय घोषित झाल्यापासून त्या ठिकाणी कमी मनुष्यबळातही डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा देत आहेत़ अशा स्थितीत त्यांना लागण होत असल्याचे समोर येत आहे़ गेल्या तीन दिवसात दोन डॉक्टर्स बाधित आढळून आले आहेत़ सातत्याने ही संख्या वाढत आहे़ त्या दोन कनिष्ठ डॉक्टर्स पुन्हा कर्तव्यावर हजरही झालेले आहेत़ यातील एका डॉक्टरवर पुणे येथे उपचार सुरू आहे, एका डॉक्टर्सचा पुन्हा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़कोविड रुग्णालयातील सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, काही तंत्रज्ञया आधी बाधित आढळून आलेले आहेत़
६ डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:29 PM