शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

'त्या' हल्ल्यास 6 महिने होऊनही अद्याप कारवाई नाही; एकनाथ खडसे हायकोर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 1:45 PM

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला एवढे दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंडच.

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेला आता 6 महिन्यांचा कालावधी झाला असून अद्यापही आरोपींवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे, याप्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपण जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच, गेल्याच आठवड्यात झालेल्या गोंधळातही तेच आरोपी होते, असेही खडसे यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला एवढे दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंडच. त्यामुळे, राजकीय दबावमुळे ही चौकशी होत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. याविषयी आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे खडसे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सहा महिन्यापूर्वी मुक्ताईनगर शहरातील गुंडांनी हल्ला केला होता. याचा तपास नाशिक आयुक्तांकडे देण्यात आला होता. मात्र, ते आयुक्त बदली झाल्याने आता दुसरे आयुक्त  आले, तरीही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही. राजकीय दबावापोटी हे घडत आहे, त्याच प्रकरणातील गुन्हेगार परवाच्या मुक्ताईनगरच्या घटनेमध्ये होते. म्हणून आम्ही औरंगाबाद खंडपीठाकडे आता दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली आहे. 

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामध्ये एकनाथ खडसे समर्थकाला महिलांनी व शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्याचे पडसाद आज मुक्ताईनगर शहरांमध्ये दिवसभर दिसून आले होते. खडसे समर्थक आक्रमक होऊन मुक्ताईनगरच्या पोलीस स्टेशन आवारामध्ये ठिय्या मांडून बसले होते. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल न झाल्यामुळे खडसे समर्थक आक्रमक होऊन, तीव्र घोषणाबाजी करत होते. यावेळी, स्वत: रोहिणी खडसे याही हजर होत्या.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावHigh Courtउच्च न्यायालय