जळगाव : शहरातून जाणा:या महामार्गाचा 450 कोटींचा ‘डीपीआर’ मार्चअखेर केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे सादर होणार असून या विभागाच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) सुरुवात करणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर साधारणत: सहा महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या शहरातून जाणा:या 15.4 कि.मी.लांबीच्या मार्गाचा महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरणासह समांतर रस्त्यासह विकास होणार आहे. या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे जिल्हाधिका:यांसमोर सादरीकरण करण्यात आले. मार्गासाठी निविदा काढण्यात येणारडीपीआरवर जिल्हाधिका:यांनी केलेल्या काही सूचनांचा समावेश करून तो मार्चअखेर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे सादर केला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर तो ‘नही’च्या दिल्ली येथील मुख्यालयाकडे येईल. एप्रिलर्पयत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नहीकडून निविदा प्रक्रियेस सुरूवात होईल. शहरातून जाणा:या महामार्गाचा तयार केलेला डीपीआर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पुढील महिन्यात सादर करून त्याला लवकरात लवकर मान्यता मिळविण्याचा प्रय} असेल. - अरविंद काळे, प्रकल्प प्रमुख, नही. असा असेल शहरातून जाणारा मार्गतरसोद ते पाळधी फाटा या 15.4 किमी रस्त्याचे चौपदरीकरण व कॉँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याची रूंदी 60 मिटर असेल. या मार्गात 60 मिटर रूंदीची जागा 10 किलो मिटरच्या लांबीर्पयत उपलब्ध आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी गिरणा नदीवर दोन समांतर नवे पूल तसेच रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचाही समावेश असेल. तसेच दोन्ही बाजुने सव्र्हीस रोड, 10 ठिकाणे ठरवून करून नंतर त्या ठिकाणी भुयारी मार्ग तसेच 20 गर्दीची ठिकाणे निश्चित करून तेथे पादचा:यांसाठी भुयारी मार्गीका असेल.
महामार्गासाठी लागणार 6 महिने
By admin | Published: February 17, 2017 1:07 AM