जळगाव : शहरात दीड महिन्यात प्रथमच नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. शहरात मंगळवारी ६ नवे बाधित आढळून आले असून ५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत १ ने भर पडली आहे. सक्रिय रुग्ण संख्या ६२ नोंदविली गेली आहे.
रुग्णसंख्याच घटत असल्याने आता बरे होणाऱ्यांचे प्रमाणही स्थिर राहिले आहे. जिल्हाभरात सक्रिय रुग्णांची संख्या आता ७०९ वर पोहोचली आहे. यात चाळीसगावात सर्वाधिक १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर भडगावात सर्वात कमी ८ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी आरटीपीसीआरचे १५७८ अहवाल आले त्यात ७ बाधित आढळून आले आहेत. तर ॲन्टीजनच्या २९८२ चाचण्या झाल्या असून त्यात ३० बाधित आढळून आले आहेत.