जिजाबराव वाघचाळीसगाव : दि. ८ : कापूस उत्पादक असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ६० हजार हेक्टरहुन अधिक कपाशीचा फेरा केला जातो. चाळीसगाव तालुक्यात बोंडअळीमुळे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिसेंबर अखेर ६० टक्के पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले आहे.५५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखालीचाळीसगाव तालुक्यात एकेकाळी ऊस लागवडीची मक्तेदारी मोडून कपाशी पेरा वाढला. ६० टक्के बागायती आणि ४० टक्के जिरायती असे लागवडीचे गणित आहे. यंदा दोन्ही क्षेत्रात ५५ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र तीन ते चार हजार हेक्टर कमी आहे.परतीच्या पावसाचा दगासप्टेंबरपर्यंत हिरव्यागार कपाशीच्या पिकाने शेतं-शिवारं डोलत होते. आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात परतीच्या पावसाने धुमशान घातले. कपीशाच्या पिकाला यात चांगलाच मार बसला. पाऊस आणि ढगाळ वातावरण यात'बोंडअळी'ला पोषक वातावरण मिळाले. सलग पंधरा दिवस ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकाला फटका बसला. मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला जावून शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले.५३ हजार ४०५ शेतकºयांना फटकाचाळीसगाव तालुक्यातील ५५ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा करणाºया ५३ हजार ६४४ हजार शेतकºयांना बोंडअळीचा फटका बसला.६० कोटींचे नुकसानसाधारणत: नुकसान भरपाईसाठी ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकºयांचा समावेश केला गेला आहे. तालुक्यातील १३६ गावांमधील कपाशी उत्पादक शेतक-यांचे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून ६० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पुर्ण झाले आहे.खर्च आणि उत्पन्न बरोबरीनेकपाशी उत्पादनासाठी एकरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो. एका एकरात तीन क्विंटल उत्पन्न कसेबसे निघाले. त्यामुळे झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न यात जवळपास सारखे आहे. बोंडअळीने शेवटी मिळणा-या उत्पन्नावरही डल्ला मारला. त्यामुळे शेतक-यांना पंचनामे पुर्ण होऊन लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याची भावना ग्रामीण भागात आहे.५१०० भाव असला तरी कपाशी मात्र शिल्लक नाहीव्यापा-यांनी देखील 'डागी' कपाशीकडे ढुकुंणही पाहिले नाही. सुरवातीला ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले. शासनाचा हमीभाव ४३६० रुपये होता. मात्र ८० टक्के कपाशीची प्रतवारी 'डिस्को' झाल्याने हमीभाव मिळविणारे शेतकरी अत्यल्प होते. सद्यस्थितीत मागणी असून भाव ५१०० रुपये प्रतिक्विंटल असूनही शेतक-यांकडे कपाशी उपलब्ध नाही.उत्पादकांना मदत मिळणार तिहेरीबोंडअळी नुकसानीचे पंचनामे सातबा-यानुसार होत आहे. त्यामुळे बहुतांशी शेतक-यांनी कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरवले. उत्पादकांना तिहेरी स्वरुपात मदत मिळणार आहे. राष्ट्रीय आपत्ती, विमा आणि हेक्टरी मदत असे तीन टप्पे आहेत. अर्थात बहुतांशी शेतक-यांनी बियाणे कंपनीबाबत तक्रार अर्ज प्रशासनाकडे सादर केले नसल्याने प्रस्ताव दाखल करतांना अडचणी येत आहे. शासनातर्फे बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ६० तर जिरायतीसाठी ५० हजार यासह विम्याचा परतावा अशी मदत दिली जाणार आहे.
बोंडअळी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत प्रशासनाच्या बैठका घेऊन सुचना दिल्या आहेत. कोणताही उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची विशेष खबरदारी घेतली आहे. शासनाने पहिल्यांदाच नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांना तिहेरी स्वरुपात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतक-यांनी बियाणे कंपनीबाबत तक्रार अर्ज तातडीने भरुन द्यावेत.- उन्मेष पाटील, आमदार चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दिवसेंदिवस सावकारी कर्जाचा फास घट्ट होत आहे. कपाशी पिकाच्या नुकसानीमुळे शेतक-यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कर्जबाजारी होण्याशिवाय शेतक-यांसमोर अन्य पर्याय नाही. शासनाने मदत तातडीने द्यावी.- गणेश पवार, अध्यक्ष रयत सेना, चाळीसगाव.