शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

जळगावात अक्षय्यतृतीयेला ६० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 8:02 PM

१०० वर चारचाकी रस्त्यावर

जळगाव : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन आणि सराफ बाजारासह घर खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असे जाणकारांनी सांगितले.अक्षय्यतृतीयेला केलेली खरेदी अक्षय असते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी विविध वस्तूंच्या खरेदीला ग्राहक पसंती देतात. त्यात सुवर्ण व जमीन-जुमला खरेदीला अधिक महत्त्व असते. बँका व पतपेढ्या आणि खाजगी वित्त संस्थांकडून शून्य टक्के व्याजाने आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे होणारा व्याजपुरवठा यामुळे बाजारपेठेत चैतन्य जाणवले.वाहन बाजारात धूमकार बाजारात उत्साह दिसून आला. दिवसभरात १०० वर चारचाकींची विक्री झाली. शहरातील एकाच शोरुममध्ये ६० गाड्यांची विक्री झाली. ७ ते १० लाख रुपये दरम्यानच्या या गाड्यांना व त्यातही डिझेलवरील वाहनांना जास्त पसंती होती. दुचाकी बाजारात तर मोठी उलाढाल होऊन नवीन ६०० दुचाकी रस्त्यावर आल्या. यात १५० सीसीला अधिक पसंती दिसून आली. सोबतच १००, १२५ सीसीलाही मागणी होती. सुमारे ६०० वाहनांची विक्री झाली.एसीला वाढली मागणीसध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांचा एसीकडे वाढत आहे. गुढीपाडव्यापाठोपाठ आता अक्षय्यतृतीयेलादेखील एसीला सर्वाधिक मागणी राहिली. या सोबतच फ्रीजलाही चांगली मागणी राहिली. सोबतच एलईडी, ओव्हन यांनादेखील मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.‘रिअल इस्टेट’मध्ये उत्साहअक्षय्यतृतीयेला घर खरेदी अथवा बुकिंग करण्याकडेही कल असतो. त्यानुसार आज अनेकांनी घरांची पाहणी करून घर बुक केले तर ज्यांनी घेऊन ठेवले होते, त्यांनी गृहप्रवेश केला. घर खरेदीकडे कल वाढल्याचे सांगण्यात आले.चारचाकी वाहन बाजारात चांगला प्रतिसाद राहिला. महिनाभरातील तुलनेत अक्षय्यतृतीयेला गाड्यांची चांगली विक्री झाली. एकाच दिवसात ६० कारची डिलिव्हरी दिली.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.इतर दिवसांच्या तुलनेत अक्षय्यतृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी होती. यात एसीला पसंती असल्याचे दिसून आले.- महेंद्र ललवाणी, विक्रेते.दुचाकी विक्रीला आज चांगला प्रतिसाद राहिला. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.-अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

टॅग्स :Jalgaonजळगाव