अडावद : डिंकाची अवैध वाहतूक करणा:यांकडून वनविभागाने 60 किलो डिंकासह दोन दुचाकी जप्त केल्या. डिंक व दुचाकी यांची एकत्रित किंमत 80 हजार रुपये आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास उनपदेव-वर्डी रस्त्यावर करण्यात आली. मात्र, अंधाराचा फायदा घेत, आरोपी पसार झाले. सातपुडय़ातून डिंकाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती अडावद वनविभागास मिळाली. या माहितीच्या आधारे कर्जाणा वनक्षेत्रपाल संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के. ए. जाधव, वनरक्षक व्ही. बी.माळी, के. एम. महाजन, सतीष पाटील यांनी सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव-वर्डी रस्त्यावर सापळा लावला. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवर (क्रमांक एमएच 19 सीसी 7381 व एमएच 19 सीएल 1009) 4 जण दोन गोणपाटात डिंक घेऊन येत होते. परंतु, त्यांना वनअधिकारी दबा धरून बसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी डिंकासह दुचाकी घटनास्थळी सोडून आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. वनअधिका:यांनी डिंकासह दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या. दोन गोणपाटात 30 हजार रुपये किमतीचा 60 किलो धावडय़ाचा डिंक मिळून आला. दुचाकींची किंमत 50 हजार रुपये आहे. असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.मोटारसायकलींच्या आधारे तपासाला दिशा मिळेल. लवकरच आरोपींना शोधून काढू. वनांचे व वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी दक्ष राहू, असे कर्जाणा वनक्षेत्रपाल संजय साळुंके यांनी सांगितले. (वार्ताहर)
60 किलो डिंकासह दोन दुचाकी जप्त
By admin | Published: March 06, 2017 12:44 AM