३ हजार भाविकांची उपस्थिती : सुभाषचौक मित्र मंडळाच्या उपक्रमामुळे वातावरण मंगलमयजळगाव: सुभाषचौकातील मानाचा गणपती सुवर्ण राजासमोर रविवारी सकाळी ९ ते ११ यावेळात सुमारे ३ हजार भक्तांनी २१ वेळा धाराप्रवाही अथर्वशीर्षाचे पठण करून सुमारे ६० हजारांहून अधिक सामूहिक आवर्तने केली. मागील वर्षीपेक्षाही यंदा गणेशभक्तांचा अधिक प्रतिसाद लाभला. सुभाष चौक भक्तांच्या गर्दीने फुललाहोता. या आवर्तनांनी परिसरातील वातावरण मंगलमय बनले.सुभाष चौक मित्रमंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च कोटीची गणपती सेवा सुमारे तीन हजार गणेशभक्तांनी गणपती अथर्वशीर्ष पठणाने दिली. कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य पंडीत महेशकुमार त्रिपाठी यांनी गणपती अथर्वशीर्षाचे महात्म्य कथन केले. समृद्धी, सुबत्ता, एकोप्याचा संकल्पश्री गणेश विद्येची देवता असून पहिली ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गणेशाची आराधना करावी. गणपतीच्या कृपेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते. सुसंस्कारीत भावी पिढी निर्माण व्हावी, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हजारोंच्या मुखातून गणपती अथर्वशीर्ष पठणाचे स्वर वातावरणात मिश्रीत होऊन निर्माण होणाऱ्या उर्जेतून राष्ट्र समृद्धी व्हावी, जळगाव शहरात व जिल्'ात शांतता व्हावी, समृद्धी, सुबत्ता, एकोपा नांदावा. कोणतेही विघ्न येऊ नये, असा संकल्प गणेशभक्तांनी सोडला. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ केंद्राचे जिल्'ाचे प्रमुख भाऊसाहेब शिंपी यांची विशेष उपस्थिती होती. अचूक नियोजनया उपक्रमाचे नियोजन आयोजकांनी अचूकपणे केले होते. वातावरण निर्मितीकरीता परिसरात आंब्याची तोरणे, झेंडूच्या फुलांच्या माळा, भगवे ध्वज व गोमुत्र श्ंिपडून पवित्रता आणली होती. भाविकांकरीता १०० बाय १५० फुटांचा मंडप टाकण्यात आला होता. तसेच बसण्यासाठी चटई अंथरण्यात आली होती. प्रसाद वाटप, अष्टगंध टिळा, महिलांसाठी हळदी-कुंकू, अथर्वशीर्ष पुस्तिका वाटप, पादत्राणाकरीता दोन विशेष स्टॉल लावण्यात आले होते. १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांद्वारे अत्यंत नियोजनपूर्वक कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. ६० हजार आवर्तनेगणपती अथर्वशीर्षात १२ श्लोक असून ते सर्व एकवेळा म्हटले की एक आवर्तन होते. दोन व्यक्तींनी ते म्हटले तर २ आवर्तने होता. अशा रितीने सुमारे ३ हजार गणेशभक्तांनी २१ वेळा या धाराप्रवाहीत गणरायाची स्तुती पठणातून सुमारे ६० हजार आवर्तने केली. गणपतीवर दुगधाभिषेक व दुर्वाभिषेक करण्यात आले. या अभिषेकातून पावन झालेल्या गणपतीच्या ५१ चांदीच्या शिक्क्यांचे भाविकांना लकी-ड्रॉद्वारा क्रमांक काढून भाऊसाहेब शिंपी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दुग्धाभिषेक सिद्धार्थ दधिच यांनी सपत्नीक केला. तर दुर्वाभिषेक नंदलाल अडवाणी व विजय जगताप यांनी सपत्नीक केला. सूत्रसंचालन पतसंस्थेचे संजय गांधी यांनी केले. यशस्वीतेसाठी श्रीकांत खटोड, मनिष अग्रवाल, प्रविण बांगर, सपन झुनझुनवाला, प्रविण भाटे, संजय पांडे, भरतकुमार शहा, गोपाल पाटील, अलोक अग्रवाल, आदित्य खटोड, समर्थ खटोड, अक्षय खटोड, हरीष चव्हाण, अनिल बांगर, नरेंद्र कापडणे, महेश दायमा, धनंजय नवगाळे, मयुर कासार, महेश गोला, रघुवीर तिवारी, सिद्धार्थ दधिच, सचिन शर्मा, अमित कासार, पंकज गव्हाळे, प्रमोद भामरे, पराग सरोदे, रवींद्र बारी, संतोष जगताप, अनिल नारखेडे, मयुर जाधव, दत्तू विसपुते, आकाश भक्कड व पतसंस्थेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
जळगावात धाराप्रवाहीत अथर्वशीर्ष पठणाची ६० हजार आवर्तने
By admin | Published: September 11, 2016 8:46 PM