आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२८-महाराष्टÑ राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरवात होत आहे. जिल्ह्यातील १३१ परीक्षा केंद्रावर ६२ हजार ८७९ विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.
१ मार्च रोजी मराठी विषयाचा पहिला पेपर घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान होत असलेल्या गैरप्रकार पाहता दहावीच्या परीक्षेच्या वेळी कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्याचे आव्हान जि.प.शिक्षण विभागासमोर आहे. १५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, डाएटचे प्राचार्य गजानन पाटील, निरंतर शिक्षण विभागाच्या प्रमुख एम.राठी यांचा सहभाग असलेले काही भरारी पथकं देखील राहणार असून, अचानक परीक्षा केंद्रावर जावुन तपासणी केली जाणार आहे.
शिक्षकांना मोबाईल बंदीपरीक्षेआधी मोबाईल व इतर माध्यमांव्दारे प्रश्नपत्रिका बाहेर येण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्षकांचे मोबाईल परीक्षेआधीच जमा केले जाणार असून, उपद्रवी केंद्रावर तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकुण ५ उपद्रवी केंद्र घोषीत करण्यात आले आहेत.
कॉपी बहाद्दरांसह पुरविणाºयांवरही होणार कारवाईगुरुवारी सकाळी १० वाजता पहिला पेपर मराठी या विषयाचा असून, कॉपी करणाºया विद्यार्थ्यांवर कारवाई तर होणारच आहे. मात्र, कॉपी पुरविणाºयांवर देखील शिक्षण विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.