लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्याने जिल्हाभरात तब्बल २० हजार २६८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत ६३ लाख ६ हजार ४०० रुपयंचा दंड वसूल केला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने देखील कोविडसंबंधी उपाययोजना लागू केल्या आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पोलीस, महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
त्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या १९ हजार ७७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून ५३ लाख ८३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १५ जणांकडून ६९ हजार ८०० रुपये, तर विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या ५६१ जणांकडून २ लाख १७ हजार ४०० रुपये दंड वसूल केला असून ५३१ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या २४१ प्रतिष्ठानांना यामध्ये मंगल कार्यालये, नाट्यगृह, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह यांना ४ लाख ८० हजार ३०० रुपये दंड करुन ४३ प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर २३ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक करताना नियम मोडणाऱ्या ३७४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांना १ लाख ५५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
अशी करण्यात आली आहे कारवाई
पोलिसांनी केलेली कारवाई
मास्क न लावणे व्यक्ती १२,६०३ दंड २६ लाख ८१ हजार २००
विहीत मर्यादेपेक्षा जास्त गर्दी ५३१ दंड १ लाख ८१ हजार ९००
प्रतिबंधात्मक उपाय न करणे प्रतिष्ठाने ३८ दंड ६९ हजार
जळगाव शहर महापालिका
मास्क न लावणे - १०२५ दंड ४ लाख८८ हजार
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ८ दंड ३५ हजार
विहित मर्यादेपेक्षा जास्त गर्दी ५ दंड २ हजार ५००
प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे प्रतिष्ठाने ८ दंड ३५ हजार
वाहने ६ दंड १० हजार
सर्व नगरपालिका, नगर परिषदा
मास्क न लावणे ५,४४९ - २२,१४,५००
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ७ ३४,८००
मर्यादेपेक्षा जास्त गर्दी २५ ३३०००
प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे प्रतिष्ठाने १९५ ३,७६३००
वाहने ३६८ १,४५,२००