आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : भाचीच्या लग्नासाठी जळगावात आलेले कापड व्यापारी नंदलाल मोहनलाल लाहोटी (वय ५६, रा.कुच्चरोटा गल्ली, पैठण, जि.औरंगाबाद) यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र व ३ हजार रुपये रोख असा ६३ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लांबविण्यात आल्याची घटना रिंगरोडवरील महेश प्रगती मंगल कार्यालयासमोर सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नंदलाल लाहोटी यांच्या भाचीचे सोमवारी जळगावात लग्न असल्याने ते चालक अशोक दिनकर सोनवणे, पत्नी सरला, लहान भाऊ रामेश्वर, भावाची पत्नी विजया, मुलगी मयुरी जाजू हे कारने (क्र.एम.एच.२० सी.एस.५७६०) जळगावात सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी साडे सहा वाजता आले होते. महेश प्रगती मंगल कार्यालयासमोरील रस्त्याच्या कडेला घरांच्या आडोशात कार लावून सर्व जण मंगल कार्यालयात गेले तर चालक हा कारमध्येच थांबलेला होता. रात्री साडे नऊ वाजता कार लॉक करुन चालकही मंगल कार्यालयात जेवणासाठी गेला. त्यावेळी कारमध्ये दोन पर्स होत्या. एका पर्समध्ये तीन तोळ्याचे मंगळसूत्र तर दुसºया पर्समध्ये तीन हजार रुपये होते. याप्रकरणी मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावात कारची काच फोडून पैठणच्या व्यापाºयाचे ६३ हजाराचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:32 PM
जळगावातील रिंगरोडवरील महेश प्रगती मंगल कार्यालयासमोरील घटना
ठळक मुद्देभाचीच्या लग्नासाठी आले अन् चोरट्यांनी साधली संधीजळगावातील रिंगरोडवरील महेश प्रगती मंगल कार्यालयासमोर घडली घटनासोन्याच्या मंगळसूत्रासह ६३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला गायब