चोपडा : शहर आणि तालुक्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ही साखळी ब्रेक होणे आता तालुक्यात खूपच कठीण असल्याचे दिसत आहे. सोमवारी एकाच दिवशी ६६ रुग्ण आढळले आहे. यामुळे आता एकूण रुग्ण संख्या १४७१ एवढी झाली आहे, तर त्यापैकी ९६० बरे होवून घरी गेले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण याप्रमाणे आहेत. वडगाव बुद्रुक ५, अडावद ७, अकुलखेडा ८, चहार्डी ३, धानोरा २, गोरगावले बुद्रुक ५, कठोरा १, गलंगी ३, शिव कॉलनी १, वढोदा १, शेतपुरा २, गुरुदत्त कॉलनी १, गुजराथी गल्ली २, उपजिल्हा रुग्णालय परिसर १, तर सुंदरगढी १, गोरगावले बुद्रुक १, मल्हारपुरा १, पाटील गढी २, गणेश कॉलनी १, धनवाडी १, हतनूर कॉलनी १, रिद्धीसिद्धी कॉलनी १, शारदानगर १, कोळंबा १, गुरुकुल नगर १, गरताड १, वेळोदे १, बजरंग नगर ४, अरुण नगर १, संजीवनी नगर ३, पंडित कॉलनी २, पांचाळेश्वर गल्ली १, मामलदे ३, श्रीराम नगर परिसर १ असे एकूण ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
चोपडा तालुक्यात पुन्हा आढळले ६६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:33 PM