जळगाव : हिमालय पर्वतरांग ही मानवासाठी या पृथ्वीतलावरील सर्वात अद्भुत व विलक्षण निर्मिती म्हटली जाते. या हिमालय पर्वतरांगेत असलेल्या अतिकठीण अशा ‘स्वर्गारोहिणी’वर (अर्थात स्वर्गावर स्वारी) जळगावातून 66 यात्रेकरू स्वारी करणार आहेत. स्वर्गारोहिणीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जाणारे हे पहिलेच पथक असेल. जळगावच्या सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्या वतीने या स्वर्गारोहिणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कैलास मानसरोवर आणि बद्रीनाथ यात्रा ह्या सर्वात कठीण यात्रा समजल्या जातात. त्यापेक्षाही कितीतरी कठीण ही स्वर्गारोहिणी यात्रा मानली जाते. जाण्या-येण्यासाठी अतिशय खडतर, सारखे चढाव आणि उताराचे मार्ग असलेल्या या स्वर्गारोहिणीवर फारच कमी भाविक जात असतात. कारण तिथले हवामान बदलत असते. एवढे असले तरी ही देवभूमी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. रोमांचक आणि आध्यात्मिक अनुभूतीचे शिखरबिंदू असलेली ही यात्रा आहे. एकाच वेळी हिमकडे, हिमनदी, धबधबे, कुरणे, जंगल आणि पर्वत शिखरे पाहण्याचा आणि अनुभवण्याचा हा एक मार्ग आहे. 29 मे रोजी जळगावहून हे भाविक हरिद्वार एक्स्प्रेसने स्वर्गारोहिणीकडे प्रयाण करतील. यात जळगाव जिल्ह्यासह पुणे, कराड, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बडोदा, हैदराबाद, मुंबई, नागपूर, सुरत आणि औरंगाबाद येथील भाविक सहभागी होणार आहेत. 5 जून रोजी निजर्ला एकादशी आहे. या दिवशी भाविक चक्रतीर्थ सरोवरात स्नानाचा आनंद घेतील. आतार्पयत अनेक भाविक येथे गेले आहेत. पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्वर्गारोहिणीवर भाविक प्रथमच जात आहेत.या भाविकांसोबत 46 पिट्ट (कामगार) व सहा गाईडची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 जणांना एक गाईड दिला जाणार आहे. प्रत्येकाला आठ किलो साहित्य सोबत नेता येईल. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने राज्य सरकार, वनविभाग, प्रदूषण महामंडळ आणि भारतीय सैन्याचीही परवानगी घेण्यात आली. हे यात्रेकरू 10 जून रोजी जळगावात परत येतील, अशी माहिती देण्यात आली. काय आहे स्वर्गारोहिणी..स्वर्गारोहिणीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. रामायण काळात रावणाने स्वर्गाकडे जाणारा पूल तयार केला होता. त्यासाठी 14 पाय:यांची निर्मिती केली होती. यातील सात पाय:या अजूनही आहेत. यातील फक्त चार पाय:यांचे दर्शन होते. याशिवाय अवतार समाप्तीच्या वेळी पाचही पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले होते. पांडवांपैकी धर्मराज युधिष्ठिर हे स्वर्गारोहिणीर्पयत पोहचले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. बद्रीनाथ मंदिराच्या मागे 39 किलोमीटर अंतरावर पर्वतरांगांमध्ये स्वर्गारोहिणी हे तब्बल 20,512 फूट अर्थात 6252 मीटर उंचीवर आहे. हे अंतर भाविकांना पायदळ आणि पायवाटेपेक्षा कमी जागेवर चालून पार करायचे आहे.
66 यात्रेकरूंची ‘स्वर्गारोहिणी’वर स्वारी
By admin | Published: May 20, 2017 12:55 AM