ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.18 : जिरायतपाडा (ता.चोपडा) येथील नागरिकांना मारहाण करून, गेल्या आठ वर्षापासून फरार असलेल्या सात आरोपींना आज सकाळी अटक करण्यात आली.
मध्यप्रदेशातील काहीजण महाराष्ट्रात येऊन सागवानी लाकडाची तस्करी करतात अशी माहिती वनविभागाला देतात या संशयावरून धावडा (मध्यप्रदेश) येथील आठजण जिरायतपाडा येथे आले होते. त्यांनी दुलसिंग कांज्या पावरा याच्यासह त्याच्या साथीदारांना मारहाण केली होती. ही घटना 12 ऑगस्ट 2009 रोजी घडली होती. याप्रकरणी दुलसिंग याच्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून आरोपी फरार होते.
रविवारी सकाळी धावडा गावाहून आरोपी प्रवासी वाहतूक करणा:या एका वाहनावर बसून येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यांनी पुन्हा सकाळी वैजापूर येथे सापळा रचला. सकाळी नऊ वाजेच्या सुमार वैजापुर गावातील चिंचेच्या झाडाजवळ प्रवासी वाहन थांबले त्यातून लाव:या नाना पावरा (35), विज्या नाना पावरा (26), गोंडा नाना पावरा (50), शे:या बोंड्या पावरा (30), इसत:या बोंड्या पावरा (25), बोंड्या नाना पावरा (25), कालुसिंग गोंडू पावरा (52, सर्व रा. धावडा ता.सेंधवा ) हे उतरताच त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
सहायक पोलिस निरीक्षक केवसलसिंग पावरा , पोलीस उपनिरीक्षक नाना दाभाडे , सहायक फौजदार आनंदा भोई , हवालदार उमेश धनगर , रामदास पावरा , विष्णू भिल यांच्या पथकाने ही कारवाई केली.