भुसावळ : येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धा सात पोलीस कोरोनाचा एन्काउंटर करत शुक्रवारी दुपारी कर्तव्यावर नव्या जोमाने हजर झाले. याप्रसंगी डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे यांनी या कर्मचाऱ्यांचे जोरदार स्वागत केले.शहरात कोरोनाने कहर केला असून कर्तव्यावर असताना कळत-नकळत कोणतीही लक्षणे नसताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचाºयांचे स्वॅब घेण्यात आले. ३१ मे रोजी रात्री आलेल्या चाचणी अहवालातून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या काही पोलीस कर्मचाºयांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर त्यांना १ जून रोजी रेल्वे रुग्णालयातील कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. यात बाजारपेठचे सर्व पोलीस कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. ११ जून रोजी रेल्वे रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.७ दिवस घरी होमक्वारंटाईन झाल्यानंतर १९ रोजी दुपारी हे पोलीस कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले.पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोरोनाचा ‘एन्काऊंटर’ करीत ७ पोलीस कर्तव्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:31 PM