शाळा व महाविद्यालये अजूनही बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील काही सेवा अजून चालू झालेल्या नाहीत, अशी माहिती एरंडोल आगार व्यवस्थापक विजय पाटील व स्थानक प्रमुख गोविंद बागुल यांनी दिली आहे.
पुणे, कल्याण, शेगाव, अकोला, नवापूर, नाशिक, बुलडाणा आदी लांब व मध्यम पल्ल्याच्या सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.
दरम्यान, परवानगीअभावी परप्रांतिय बससेवा अजून सुरू व्हायच्या आहेत, असे सांगण्यात आले.
तळई, भडगाव, पाचोरा-चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, कासोदा व चाळीसगाव या मुक्कामी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ग्रामीण भागातील बससेवा पुरेशा प्रमाणात सुरू न झाल्यामुळे ग्रामीण जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे.
लांब व मध्यम पल्ल्याच्या सेवांमुळे एरंडोल बस आगाराच्या दैनंदिन उत्पन्नात मोलाची भर पडली आहे. तसेच मालवाहतुकीमुळे बस आगाराच्या उत्पन्न वाढीस मोठा हातभार लागला आहे.
एरंडोल बसआगाराची १०० टक्के बससेवा अजूनही सुरू झाली नसल्यामुळे काही बसगाड्या बसआगारात क्वारंटाईन आहेत.