शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

गणेशोत्सव काळात वाढले ७ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 12:21 PM

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत जात असून, २८ हजाराच्या घरात पोहचली आहे. गणेशोत्सव काळात जिल्हाभरात एकूण ७ ...

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत जात असून, २८ हजाराच्या घरात पोहचली आहे. गणेशोत्सव काळात जिल्हाभरात एकूण ७ हजार ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट जळगावकरांवर अधिकच गडद होत जात आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात केवळ एकच कोरोनाचा रुग्ण होता. मात्र, आॅगस्टअखेरपर्यंत ही संख्या २७ हजाराच्या पार गेल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंतेच्या ढगांनी गर्दी केली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता पाचपटीने वाढू लागला आहे. शासनाकडून प्रत्येक महिन्यात लॉकडाऊनमध्ये बदल करून, अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जात आहे. प्रत्येक महिन्यात विविध अस्थापना व मार्केट सुरु करण्यास परवानगी दिली जात असताना, दुसरीकडे त्याच वेगाने कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८३० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही नागरिक कोरोनाच्या काळात आखून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांकडूनच हरताळ फासला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.‘भय’ अजून संपलेले नाहीजिल्ह्यात आतापर्यंत ८३० हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्या ही वाढतच आहे.नियमांना हरताळप्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पलन करण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणपती आगमन व विसर्जनादरम्यान नियमांचे पालन करण्यात आले नाही. जिल्ह्यात पाचव्या, सातव्या व अकराव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येते. मात्र, याकाळात अनेक ठिकाणी गणेशभक्तांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा नियमांकडे दुर्लक्ष केले.गणेशोत्सव काळातील आकडेवारी-२२आॅगस्ट - ६१६-२३ आॅगस्ट - ६०५-२४ आॅगस्ट - ६०५-२५ आॅगस्ट - ६०४-२६ आॅगस्ट -८५८-२७आॅगस्ट - ७०८-२८ आॅगस्ट - ७८०-२९ आॅगस्ट - ५६६-३० आॅगस्ट - ६९६-३१ आॅगस्ट - ४५६-१ सप्टेंबर - ५४१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव