जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने नवीन रुग्णांपेक्षा अधिक आढळून येत आहे़ त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्याही घटत असल्याचे चित्र असून उपचार घेणाºयांपैकी ७१ टक्के रुग्ण हे लक्षणेविरहीत आहेत. ही मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे.कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे बाधित होणाºयांचे प्रमाणही वाढत आहे. नवीन रुग्णही झपाट्याने समोर येत आहेत़मात्र, कमी लक्षणे असणे किंवा अगदीच लक्षणे नसणे अशा रुग्णांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे़ अशा रुग्णांना केवळ दहा दिवसांसाठी विलगीकरणात ठेवले जाते़ त्यासाठी स्थानिक पातळ्यांवर कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे़गृह विलगीकरणाचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरी या प्रक्रियेला लागणारा विलंब हा डोकेदुखी वाढविणारा असल्याने रुग्णांना घरी पर्याय असतानाही कोविड केअर सेंटरलाच रहावे लागत आहे़प्रशासनाची तयारीरुग्ण वाढीचा वेग बघता प्रशासनाने जुलैत मोठ्या प्रमाणावर आॅकिसजन बेड उभारले आहेत़ यात लोकसहभागाचा मोठा वाटा राहिला असून आता तालुकास्तरावरच रुग्णांना आॅक्सिजन उपलब्ध होत आहे़ सद्या स्थितीतही उपलब्ध बेडची संख्या बºयापैकी असल्याने आगामी काळात रुग्णवाढल्यास प्रशासनाची तयारी असल्याचे सद्यस्थितीत चित्र आहे़अशी आहे स्थितीउपचार घेणोर रुग्ण : ३०२०लक्षणे नसलेले रुग्ण :२१५७आॅक्सिजनवरील रुग्ण : २९१व्हेंटीलेटरवरील रूग्ण : ८५उपलब्ध बेडची संख्याकोविड केअर सेंटर ६६९डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर : ४५८डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल्स : ३५५
उपचार घेणाऱ्यांमध्ये ७१ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 11:53 AM