शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

जळगाव जिल्ह्यात ७१ हजार शौचालयांचे काम बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:56 PM

८५ टक्के काम पूर्ण

ठळक मुद्देदोन महिन्यात उद्दीष्टपूर्ती जिह्यातील हगणदारीमुक्तीच्या कामावर नाराजी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिह्यातील नऊ तालुक्यांमध्ये हगणदारीमुक्तची ८५ टक्के काम पूर्ण झाले असून अर्ध्याहून अधिक मार्च महिना उलटला तरी ७१ हजार वैयक्तिक शौचालयांची कामे बाकी आहे. येत्या दोन महिन्यात जिह्यातील कामे पूर्ण होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी दिली.शासनाच्यावतीने राज्यभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्तीच्या कामांना गती देण्यात येत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये हागणदारी मुक्ती जाहीर करण्यात आली आहे, मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कामे अद्याप अपूर्ण आहेत अशा जिल्ह्यांचा शासनातर्फे आढावा घेतला जात आहे. यासंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग उपसंचालक रुचेष जयवंशी यांनी गेल्या आठड्यात जिल्हा परिषदेत येऊन कामकाजाचा आढावा घेतला असता जिह्यातील हगणदारीमुक्तीच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्ह्यात त्यामुळे उर्वरित सर्व कामे येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.जिल्ह्यात जळगाव, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, चोपडा, यावल या नऊ तालुक्यात शौचालयांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. उपसंचालकांच्या सूचनेनुसार प्रत्येक गावात स्थानिक अधिकारी नेमून कामांना गती देण्यात आली असली तरी ही कामे मार्च अखेर पूर्ण होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात हगणदारीमुक्तीसाठी एकूण २ लाख ४ हजार २९१ वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ठ देण्यात आले होते, त्यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ९९१ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. तर ७१ हजार १०२ कामे बाकी आहेत. यासाठी वर्षभरात ५३ कोटी ७३ लाखांचा निधी खर्च झाला आहे. यात ८२ हजार लाभार्थ्यांचे अनुदान देणे बाकी आहे. तर उर्वरित कामांसाठी पुन्हा ९७ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.धरणगाव - ९५२४, भडगाव ९५०७, भुसावळ - २४, बोदवड - २९६८, एरंडोल - ८१४४, मुक्ताईनगर - ६७०८, रावेर - १०६६०, जळगाव - ९७७९, पारोळा - ७२०२, यावल - ८१३३, अमळनेर - १००३४, चोपडा- ८६९४, चाळीसगाव - ११४०७, पाचोरा - १०३६४, जामनेर - १०८४३ असे एकूण १ लाख २३ हजार ९९१ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. यात धरणगाव, भडगाव, भुसावळ, बोदवड, एरंडोल, मुक्ताईनगर हे सहा तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद