रावेर, जि. जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेतर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून ७३ मीटर लांबी असलेल्या तिरंग्याची मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विविध महाविद्यालय, शाळेचे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.सरदार जी.जी.हायस्कूलच्या प्रांगणात खासदार रक्षा खडसे, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, अभाविपचे प्रमुखवक्ते गितेश चव्हाण यांच्या स्ते भारत मातेचे पूजन करून या तिरंगा पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गवरून या पदयात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. अंबिका व्यायाम शाळेचे प्रांगणात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, अभाविप शहराध्यक्ष युवराज माळी, शहर मंत्री अभिजित लोणारी, प्रमुख वक्ते गितेश चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, उद्योजक श्रीराम पाटील, माजी जि. प. सभापती सुरेश धनके, अमोल पाटील, अंबिका व्यायाम शाळेचे भास्कर महाजन, नगरसेवक शारदा चौधरी, संगीता महाजन, संगीता वाणी, यशवंत दलाल, मुख्याध्यापक शिरीष वाणी, कृऊबा संचालक गोपाल नेमाड़े व विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गणेश शिंदे, संजू महाजन, अविनाश पाटील, सागर चौधरी, चेतन महाजन, भूषण महाजन, दिलीप महजन, बॉबी गांगवे, लोकेश महाजन, सनी महाजन, राहुल पाटील, मनीष मानकर, जयेश बिरपन, गौरव चौधरी, गंधर्व, शुभम महाजन, रूषी वरणकर, यश सोनार कुणाल महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Independence Day : रावेरला ७३ मीटर तिरंगा पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:31 PM