चुडामण बोरसे/ ऑनलाईन लोकमत जळगाव,दि.28 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी बृहत आराखडा सादर केला आहे. यात नवीन 74 महाविद्यालयांचा समावेश आहे. या प्रस्तावित आराखडय़ास अद्याप मान्यता मिळालेली नाही. हा बृहत आराखडा एप्रिल 2017 मध्येच महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगास सादर केला होता. त्यात पुन्हा दुरुस्ती करून हा अहवाल गेल्या महिन्यात आयोगाला सादर करण्यात आला. या नवीन आराखडय़ानुसार, प्रस्तावित 74 महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा आहेत. तसेच व्यवस्थापन शास्त्राच्या 11 शाखाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. प्रस्तावित महाविद्यालये असे असतील.जळगाव जिल्हा जळगाव- शिरसोली, नशिराबाद, भोकर, म्हसावद. अमळनेर- जानवे, पातोंडा, मांडळ. धरणगाव- पाळधी, बांभोरी बुद्रूक, साळवा. एरंडोल- कासोदा, कढोली. चोपडा- हातेड, उमर्टी, घोडगाव, गलंगी, चहार्डी. चाळीसगाव- वाघळी, तळेगाव, पिंपरखेड, मेहुणबारे. पाचोरा- नगरदेवळा, लोहारा. भडगाव- कजगाव, जुवार्डी. पारोळा- तामसवाडी, देवगाव. जामनेर- फत्तेपूर, नेरी, पहूर. रावेर-रावेर, चिनावल. यावल- हरिपुरा, किनगाव, साकळी, शिरसाठ. मुक्ताईनगर- अंतुर्ली, कु:हा काकोडा. बोदवड- जामठी, भुसावळ- दीपनगर, कु:हे पानाचे.धुळे जिल्हा- धुळे - शहर, अवधान, फागणे, मुकटी, बोरकुंड, नेर, शिरुड, आर्वी, महिंदळे. शिरपूर- अर्थे, वरुड, सांगवी. शिंदखेडा -धमाणे, विरदेल, ब्राrाणे. नंदुरबार जिल्हा- नंदुरबार- नंदुरबार, रनाळे. नवापूर- नवापूर, विसरवाडी, नवागाव, खांडबारा. शहादा- मंदाणे, तोरणमाळ, ब्राrाणपुरी. तळोदा- बोरद, प्रतापपूर. अक्कलकुवा- मोलगी. पाच महिला महाविद्यालये याशिवाय उच्च शिक्षणासाठी महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाच महिला महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. तीन तालुके मिळून एक महिला महाविद्यालय असेल. खान्देशात विद्यापीठ क्षेत्रात काही ठिकाणी एस.एन.डी.टी. महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे त्या तालुक्यांचा विचार यात करण्यात आलेला नाही. कौशल्य विकास महाविद्यालयेया बृहत आराखडय़ात खान्देशात 32 ठिकाणी कौशल्य विकास महाविद्यालये प्रस्तावित आहेत. जळगाव जिल्हा- जळगाव- जळगाव, म्हसावद, शिरसोली. भुसावळ, रावेर व यावलसाठी एक. मुक्ताईनगर, बोदवड व वरणगावसाठी एक. पाचोरा व भडगावसाठी एक, पारोळा व एरंडोलसाठी एक, अमळनेर, धरणगाव, चोपडा, जामनेर, चाळीसगाव येथे प्रत्येकी एक. तसेच पारोळा तालुक्यात धूळपिंप्री, हिरापूर येथेही महाविद्यालये प्रस्तावित आहेत. धुळे जिल्हा- धुळे येथे दोन, अवधान, वाडीभोकर, शिंदखेडा-नरडाणा, शिरपूर, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर, निजामपूर. नंदुरबार जिल्हा- नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव आणि मोलगी. सॅटेलाईट सेंटरचाही प्रस्ताव विद्यापीठांतर्गत येणा:या मोठय़ा महाविद्यालयांसाठी सॅटेलाईट सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करण्याची तयारी विद्यापीठाने दाखविली आहे. नंदुरबार येथील आदिवासी अकादमी किंवा एकलव्य केंद्रांतर्गत कला अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव अपेक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कौशल्य विकास यावर कोर्सेस सुरू करण्याचाही विद्यापीठाचा मानस आहे. यासाठी प्रस्ताव अपेक्षित आहेत.नंदुरबारला होणार अभियांत्रिकी महाविद्यालय नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तिथे एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने तिथे आता एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार आहे. याशिवाय तीनही जिल्ह्यात चार ठिकाणी कला, वाणिज्य आणि व्यवस्थापनाची चार रात्रकालीन महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत.
खान्देशात होणार 74 नवीन महाविद्यालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 7:02 PM
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा प्रस्तावित सुधारित बृहत आराखडा
ठळक मुद्देबृहत आराखडय़ात नवीन 74 महाविद्यालयांचा समावेश नंदुरबारला होणार अभियांत्रिकी महाविद्यालय मोठय़ा महाविद्यालयांसाठी सॅटेलाईट सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्तावखान्देशात 32 ठिकाणी कौशल्य विकास महाविद्यालये प्रस्तावित