आॅनलाईन लोकमतजळगाव दि १३, : स्टेट बॅँक कॉलनीतील रहिवाशी विजय रामभाऊ जैन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे तुकडे व साडे चार हजार रुपये रोख असा ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सलग दुसरी घरफोडी आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय जैन हे शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स या कंपनीत नोकरीला आहेत. औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे लग्न असल्याने ते पत्नी निलिमा, मुलगी पालवी यांच्यासह १० फेबु्रवारी रोजी घराला कुलुप लावून गेले होते. मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता घरा शेजारी राहणारे अरविंद जालान यांनी फोन करुन घराचा दरवाजा उघडा व कुलुप तुटल्याची माहिती दिली. त्यामुळे जैन हे तातडीने सायंकाळी घरी पोहचले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता तर बेडरुमधील फर्निचरचे दोन कपाट उघडे होते. त्यातील सामान पलंगावर पडलेला होता.लॉकरमध्ये ठेवलेले ४० हजार रुपये किमतीचा २५ ग्रॅमचा एक तर ३० हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅमचा दुसरा सोन्याचा तुकडा गायब झाला होता. यासह साडे चार हजार रुपये रोखही गायब झाले होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर विजय जैन यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
जळगाव शहरातील स्टेट बॅँक कॉलनीत ७५ हजाराची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:11 AM
स्टेट बॅँक कॉलनीतील रहिवाशी विजय रामभाऊ जैन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे तुकडे व साडे चार हजार रुपये रोख असा ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सलग दुसरी घरफोडी आहे.
ठळक मुद्दे घरफोडीचे सत्र सुरुचगुन्हा दाखल औरंगाबाद येथे लग्नाला गेले होते कुटुंब