रावेर : शहरातील एका ७५ वर्षीय वृद्ध मातेला तिघेही मुले सांभाळत नसल्याने त्यांच्याकडून खावटी मिळवण्यासाठी तब्बल पाच वर्षे रावेर न्यायालयाचे खेटे मारल्यावर लोक न्यायालयात न्याय मिळाला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी मथुराबाई नामदेव चौधरी (७५) यांनी रावेर न्यायालयात मुरलीधर नामदेव चौधरी अशा तिन्ही मुलांविरुध्द रावेर न्यायालयात गत पाच वर्षांपासून खावटीचा दावा दाखल केला होता. तथापि, शनिवारी लोकन्यायालयात दिवाणी न्यायाधीश अनंत बाजड, वकील ॲड. व्ही. पी. महाजन, पॅनल पंच सदस्य पत्रकार राजेंद्र अटकाळे व ॲड. मेघनाथ चौधरी तथा ॲड. रमाकांत महाजन यांनी तिघाही मुलांसह ७५ वर्षीय वृद्ध मातेला मातृत्व व कर्तृत्वाचा मोलाचा सल्ला देत मनोमीलन घडवून आणल्याने ७५ वर्षीय वृध्द मातेला वृध्दापकाळात न्याय मिळवून दिला. त्या अनुषंगाने या माता व पुत्रांचा न्या. अनंत बाजड व ॲड. व्ही. पी. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सदर लोकन्यायालयात दिवाणी न्यायाधीश न्या. अनंत एच. बाजड, सह दिवाणी न्यायाधीश आर. एम. लोळगे यांचे दोन पॅनल ठेवण्यात आले होते.
रावेर न्यायालयातील एकूण ठेवण्यात आलेले ३०० प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५८ खटल्यांचा निपटारा करण्यात आला. त्यातील एकूण रक्कम रुपये ७ लाख २ हजार ५,९९ रुपये वसूल करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीचे, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे, भारत दूरसंचार निगमचे, रावेर नगरपालिकेचे व बँकेचे ठेवण्यात आलेले दाखलपूर्व एकूण १ हजार ३७ प्रकरणापैकी १०६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून तडजोड रक्कम ३८ लाख २ हजार ४४५ रुपये वसूल करण्यात आले.
पॅनल नंबर १ चे पंच सदस्य म्हणून ॲड. मेघनाथ चौधरी व राजेंद्र अटकाळे, पॅनल नंबर २ चे पंच सदस्य म्हणून ॲड. समीर तडवी व आशिष जहुरे यांनी काम पाहिले.
सदर लोकअदालतीला रावेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. जगदीश महाजन व न्यायलयीन कर्मचारी ए. एम. सुगंधीवाले, उपाध्यक्ष ॲड. एस. बी. सांगळे, सचिव ॲड. धनराज इ. पाटील, ॲड. व्ही. पी. महाजन, ॲड. आर. एन. चौधरी, ॲड. बी. डी. निळे, ॲड. प्रमोद विचवे, ॲड. डी. डी. ठाकूर, ॲड. तुषार चौधरी, ॲड. रमाकांत महाजन, ॲड. के. बी. खान, राकेश पाटील, ॲड. प्रवीण पाचपोहे, ॲड. योगेश गजरे, ॲड. धुंदले, ॲड. मुख्तार शेख, ॲड. जे. जी. पाटील, ॲड. मुजाहिद शेख, ॲड. सलीम जामलकर, ॲड. अमोल कोंगे, ॲड. सतीष वाघोदे, ॲड. समीर तडवी आदी वकील मंडळी उपस्थित होते. एम.जे. शिंपी, के. आर. वाणी, एस. आर. तडवी, व्ही. डी. मोरे, डी. व्ही. राखुंडे, भरत एस. बारी, डी. एस. डिवरे, के. बी. माने, विश्वनाथ चौधरी, देवचंद आर. जावळे, एन. एम. पाटील, सतीश रावते, के. एस. पाटील, विशाल नाथजोगी यांनी सहकार्य केले.
रावेर लोकन्यायालयात ७५ वर्षीय वृध्द माता मथुराबाई चौधरी व त्यांच्या मुलांचा सत्कार करताना न्या. ए. एच. बाजड, ॲड. व्ही. पी. महाजन, ॲड. मेघनाथ चौधरी आदी. (छाया : किरण चौधरी)