बोदवड : शहरातील ७५ वर्षीय महिलाही पॉझिटिव्ह आढळली असून, आता रुग्ण संख्या आठ झाली असून, तीन खासगी डॉक्टरही विलगीकरणात गेले आहेत.शहरातील रेणुका माता मंदिर परिसरात असलेल्या व जळगाव येथे उपचार घेत असलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात सात जणांचे स्वब काढण्यात आले होते, तर एकाला जळगाव हलविण्यात आले होते. त्यात जळगाव येथे उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला, तर बोदवड येथील पहिल्या टप्यात पाठवलेल्या सात जणांचे कोरोना अहवाल आले असून यात सहा जण पॉझिटिव्ह आले आहे, तर एक निगेटिव्ह आला असून, त्या पैकी तीन जणांना आज गोदावरीच्या कोविड सेंटरला हलविण्यात आले असून, तीन जण बोदवड कोविड सेंटरला उपचार घेत आहे. यात एका ७५ वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील अजून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना उपचार करणाऱ्या एका खासगी प्रसिद्ध डॉक्टरसह कम्पांउंडलाही क्वॉरंटाईन राहण्याचे सांगण्यात आले आहे.शहरातील स्वामी विवेकानंद नगरमधील ३६ वर्षीय तरुणही कोरोना संक्रमणाच्या संपर्कात आढळून आला असून, त्याच्या कुटुंबातील १६ तर संपर्कातील आठ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आह.े त्यात १६ जणांचे स्वब तपासणीला पाठविण्यात आले आहे, तर यात दोन खासगी डॉक्टरांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून, शहरात एकूण तीन खासगी डॉक्टरसह एक लॅबचालक आता होम क्वॉरंटाईन आहे.या कॅन्टोनमेंट झोनमध्ये तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बोदवड शहरातील ७५ वर्षीय महिलाही आली पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 4:01 PM
७५ वर्षीय महिलाही पॉझिटिव्ह आढळली असून, आता रुग्ण संख्या आठ झाली असून, तीन खासगी डॉक्टरही विलगीकरणात गेले आहेत.
ठळक मुद्दे एकूण संख्या आठतीन खासगी डॉक्टरही विलगीकरण