शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्ह्यात दरमहा ८-१० पॉस मशिन तांत्रिक कारणाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:57 AM

बायोमेट्रीक रेशनकार्डसाठी तयारी सुरू

ठळक मुद्देबंद मशिनमुळे अडथळाबायोमेट्रीक रेशनकार्डसाठी माहिती मागविणे सुरूआधारकार्डची प्रत देणे आवश्यक

जळगाव: बायोमेट्रीक रेशनकार्ड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेशनकार्डधारकांकडून माहिती घेणे सुरू केले असले तरीही मार्चपासून अंमलबजावणी करावयाच्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश नाही. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यास प्रशासनाला अधिक कालावधी मिळणार आहे. दरम्यान पॉस मशिनद्वारे धान्यवितरण सुरू करण्यात आले असले तरीही जिल्ह्यात दरमहिन्याला ८-१० मशिन तांत्रीक कारणांमुळे बंद पडत असल्याने त्या ठिकाणी लाभार्थी वंचित राहू नये यासाठी पूर्वीच्याच पद्धतीने धान्य वितरण करावे लागत आहे. मशिन बंद पडणे व दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच असल्याने जिल्ह्यात पॉस मशिनद्वारे धान्य वितरणाचे उद्दीष्ट ९९ टक्क्यांपर्यंत गेले आहे.६ तालुक्यात १०० टक्के मशिन सुरूफेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, बोदवड, चोपडा, जामनेर, यावल, चाळीसगाव, रावेर या सहा तालुक्यात १०० टक्के पॉस मशिन सुरू होते. तर उर्वरीत तालुक्यांमध्ये ९८ ते ९९ टक्के मशिन सुरू होते.रेकॉर्डवरून १ दुकान गायबएकूण १९२९ रेशन दुकाने असून त्यापैकी १९१७ रेशन दुकानांना धान्य पुरविले जाते. त्यापैकी १९१६ रेशन दुकानांचे रेकॉर्ड पुरवठा विभागाकडे असून एक दुकान पुरवठ्याच्या रेकॉर्डमधून गायब आहे. त्याचा शोध घेणे सुरू आहे. या १९१६ दुकानांपैकी १९०७ दुकानांमधील पॉस मशिन फेब्रुवारी महिन्यात कार्यरत होते. म्हणजेच त्यामार्फतच धान्य वितरण झाले. तर ६ तालुक्यातील ९ रेशन दुकाने तांत्रिक कारणाने बंद  होते.बायोमेट्रीक रेशनकार्डसाठी तयारी सुरूजिल्ह्यात मार्चपासून बायोमेट्रीक रेशनकार्ड लागू होणार नसले तरीही एप्रिलपासून ते लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ७० हजार ८४३ रेशनकार्डधारक आहेत. त्यात अंत्योदय योजनेचे १ लाख ३७ हजार ५४२ तर प्राधान्य योजनेचे ४ लाख ६५ हजार ८९४ रेशनकार्ड धारक आहेत. उर्वरीत केशरी व पांढºया शिधापत्रिकाधारक आहेत. यातील अंत्योदय व प्राधान्य योजनेतील रेशनकार्डधारकांनाच रेशनचे वितरण होते. मात्र सर्व रेशनकार्डधारकांना बायोमेट्रीक रेशनकार्ड पद्धत लागू होणार असून त्यासाठी प्रत्येक रेशनकार्ड धारकाकडून त्या कार्डवरील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स मागविली जात आहे. ती माहिती आरसीएममध्ये भरण्याचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे काम तातडीने पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे तहसीलदारांना रेशनकार्डधारकांकडून तातडीने माहिती मागविण्याचे आवाहन करण्यातआलेआहे.