आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२२ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाºयाने निच्चांक गाठला आहे. त्यामुळे आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, पालिका विहिचीही पाणीपातळी खालावल्याने पन्नास वर्षांत कधी नव्हे तो यंदा विहिरीतून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा करावा लागत असल्याची स्थिती आहे.विहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल. आधीच तापी बंधाºयात पाणी कमी असल्याने पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.जलसंकटाच्या काळात पाण्याचे स्त्रोत असलेला तापीनदीवरील बंधाºयाने नीचांक गाठला आहे. हतनूर धरणात पाणीसाठा एवढाच गाळाचा साठा आहे, अशी गंभीर स्थिती असताना पालिका विहिरीचा आसरा घेऊन त्याद्वारे शहरांची तृष्णा शमवीत असताना पालिका विहिरीत गाळ व घाण साचली आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.रोज चाळीस टँकरचा उपसाशहरवासीयांची तहाण शमविण्यासाठी पालिका विहिरीतून रोज चाळीस-पन्नास टँकर पाण्याचा उपसा होतो. टँकरची क्षमता पाच हजार लिटर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया टँकरची क्षमता १२ हजार लिटर आहे. टँकर ग्रामीण भागात कंडारी, गोलाणी परिसरात चार फेºया मारते. मांडवेदीगरला दोन फेºया याच विहीरीतील पाण्याच्या होतात.
भुसावळात आठ दिवसाआड पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:39 PM
पालिका विहिरीची पाणी पातळी खालावल्याने टंचाईची तीव्रता वाढणार
ठळक मुद्देसध्या भुसावळात आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठाविहिरीतून होतो रोज चाळीस टँकरचा उपसाविहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल.