जळगाव : शहरात आणण्यासाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर ठेवलेला सात लाख ७६ हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.बंदी असलेला गुटखा शहरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी विभागाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे, अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी खात्री करून त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात पाळत ठेवली. त्या वेळी सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक रस्त्यावर एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयासमोर प्लॅस्टिकचे खोके व गोण्या आढळून आल्या. काही वेळाने माल ताब्यात घेण्यासाठी दिलीप रमेश बदलानी हे तेथे आले. त्या वेळी त्यांची चौकशी केली असता सदरचा माल त्यांच्या मालकीचा असल्याचे त्यांनी कबूल केले. मालाची पाहणी केली असता १९ खोक्यांमध्ये गुटख्याचे ३८०० पाकिटे आढळून आले आणि दोन गोण्यांमध्ये तंबाखूचे २००० पाकिटे आढळून आले. सात लाख ७६ हजार रुपये किंमतीचा हा माल अधिकाºयांनी ताब्यात घेतला.
जळगावात पावणे ८ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 9:23 PM
शहरात आणण्यासाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर ठेवलेला सात लाख ७६ हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देपाळत ठेवत घेतला माल ताब्यातअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई