जळगाव : मुंगसे ता़ अमळनेर येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. प्रलंबीत १०५ अहवालांपैकी ६४ प्राप्त झाले असून ६१ निगेटीव्ह तर ३ पॉझिटीव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. शनिवारी सायंकाळी आणखी २९ अहवाल प्रशासनास प्राप्त झालेले आहेत.
मुंगसे येथील बाधित महिलेच्या संपर्कातील ८ जण निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 6:25 PM