चोपडा : तालुक्यात मालापूर येथे एकमेव धरण असलेल्या गूळ मध्यम प्रकल्पातही ८० टक्के साठा झाला असल्याची माहिती शाखा अभियंता प्रीती पोटदुखे यांनी दिलीे. गूळ प्रकल्पात सध्याची पाणी पातळी २६६.७४० मीटर एवढी आहे. या धरणात एकूण १८.२५ घनमीटर एवढा एकूण साठा होऊ शकतो. तर सध्या १७.७६ घनमीटर एवढा साठा झालेला आहे. सध्या केव्हाही जोरदार पाऊस होऊ शकतो याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री प्रकल्पाचे दरवाडे उघडले जातात. त्यातून पाण्याचा विसर्ग होतो, अशीही माहिती पोटदुखे यांनी दिली. तालुक्यात एकूण सातही मंडळांमध्ये दमदार पाऊस झाल्याने टंचाई दूर झाली आहे.
गूळ प्रकल्पात ८० टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 9:22 PM