जळगाव : वेळेवर पैसे किंवा कुठलीही शाश्वती दिली न गेल्याने नाशिक येऊन आलेले ८ व्हेंटीलेटर्स परत गेल्याचा धक्कादायक प्रकार शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात समोर आला आहे़ शुक्रवारी हा प्रकार घडला असून तीन दिवसांपासून यासाठी आता यंत्रणेचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती रुग्णालयातील विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे़शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने नोंदविलेल्या मागणीनुसार एक खासगी पुरवठादार नाशिक येथून शुक्रवारी ८ व्हेंटीलेटर्ससह ते बसविणारी पूर्ण सहा लोकांची टीम घेऊन जळगावात आला़ मात्र, सहा तासांपर्यंत या पुरवठादाराला पेमेंटबाबत कुठलीही शास्वती दिली गेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली़ रुग्णालय प्रशासन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते, अशा परिस्थितीत खात्री नसल्याने अखेर हा पुरवठादार हे व्हेंटीलेटर्स घेऊन परतल्याची माहिती समोर आली आहे़ ८ व्हेंटीलेटर्सची १ कोटी ३ लाख रूपये किमंत असल्याची माहिती आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून व्हेंटीलेटर्सचे नियोजन असताना देयकांबाबत नियोजन नसल्याने हा गंभीर प्रकार घडल्याचेही सांगण्यात येत आहे़कळीचा मुद्दा अन् असेही दुर्लक्षशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्हेंटीलेटर्सचामुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्हँटीलेटर्सची मागणी होत आहे़ शिवाय कोविडच्या काळात वाढते मृत्यूदर हा यामुळे हा मुद्दा अधिकच तीव्रतेने समोर आला होता़ अशा स्थितीत गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी व्हेंटीलेटर्स येणार असल्याचे चित्र होते़ अनेक बैठकांमध्ये हा मुद्दा गाजला, शिवाय सोमवारीच झालेल्या लोकप्रतिनिधींसोबतच्या बैठकीत हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला़ अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती़व्हेंटीलेटर्स परत गेले असे नाही, पुरवठादाराला पूर्ण पेमेंट त्याचवेळी हवे होते़ २५ व्हेंटीलेटर्स हे नागपूरला आले असून ते गुरूवारपर्यंत जळगावात येणार आहे़ सद्यस्थितीत ६ व्हेंटीलेटर्स कार्यान्वयीत आहे़- डॉ़ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
पैसे न दिल्याने ८ व्हेंटीलेटर्स गेले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:51 AM