जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय व एआयसीटीई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिजिटली कंट्रोल्ड पॉवर कन्व्हर्टरफॉर इंडस्ट्रियल अॅण्ड रिन्यूएबल अॅप्लिकेशन्स या विषयावरील कार्यशाळेचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या कार्यशाळेमध्ये देशभरातील ८० प्राध्यापक व संशोधक स्नातकांनी सहभाग नोंदविला आहे.
संशोधनाला गती देण्यासाठी एआयसीटीई न्यू दिल्लीद्वारा तीन कार्यशाळेला संमती देण्यात आली आहे. त्यातील तृतीय कार्यशाळेचे उद्घाटन नुकतेच मुंबई आयआयटीचे डॉ. चेतनसिंग सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय शेखावत, समन्वयक डॉ. पी.जे.शाह, डॉ. एस. आर. सुरळकर, व्ही एस. पवार, डॉ. पी. व्ही. ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये प्रमुख मान्यवरांकडून प्राध्यापक व संशोधन स्नातकांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच पॉवर इलेक्ट्रोनिक्स आणि रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रातील सद्य:स्थितीतील संशोधन आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस. आर. सुरळकर, व्ही.एस. पवार, डॉ. पी.जे. शाह, डॉ. पी.व्ही.ठाकरे, प्रा. अमोल वाणी, प्रा. धनेश पाटील, प्रा. नीलेश महाजन, डॉ. पी. एच. झोपे, प्रा. सतपाल राजपूत, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.