लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आता गंभीर रुग्णांमध्येही एकाच दिवसात मोठी घट पाहायला मिळाली आहे. त्यात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ८१ ने तर अतिदक्षता विभागातील रुग्णसंख्या २८ ने घटली आहे. बरे होणारे रुग्ण वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या आता ८ हजार ७८८ वर पोहोचली आहे.
शहरात शुक्रवारी ३० नवे कोरोना बाधित आढळून आले तर ९३ जणांनी कोरोनावर मात केली. सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे. ग्रामीणमध्येही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून १९ नवे रुग्ण तर ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्यात ७४१ वर आलेली आहे. तर ग्रामीण भागात २७५ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील रुग्णसंख्या सातत्याने घटत असून आता ही संख्या शंभराच्या खालीच स्थिर आहे. ही संख्या आता ३० वर येऊन ठेपली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १० व त्यापेक्षा कमी रुग्णांची नोंद आहे.
सक्रिय रुग्ण ८७८८
ऑक्सिजनवरील रुग्ण ८८९
आयसीयूतील रुग्ण ४८५
लक्षणे नसलेले रुग्ण ७१६३