जळगाव : गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या १ हजारांपेक्षा खाली स्थिर असून गुरुवारी जिल्ह्यात ८५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १००५ रुग्ण बरेदेखील झाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
गेल्या दीड महिन्यात बिकट परिस्थिती असलेल्या चोपडा तालुक्यात परिस्थिती सुधारत असून सक्रिय रुग्णांची संख्या ५०० वर पोहोचली आहे. नियमित समोर येणारे रुग्ण हे शंभरापेक्षा कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. जळगाव शहरातही हीच परिस्थिती आहे. भुसावळ, चाळीसगावात काहीशी रुग्णवाढ समोर येत आहे. जळगाव शहरात गुरुवारी १३४, चोपडा येथे ४१, भुसावळ १२० रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे गुरुवारी सुटी नसतानाही चाचण्यांची संख्या कमी असून नियमितपेक्षा तिपटीने चाचण्या कमी झाल्या आहेत. ॲण्टिजेनच्या केवळ ३६४६ चाचण्या झाल्या आहेत.