आनंद सुरवाडे ।जळगाव : कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हे तीन महिन्यानंतरही सर्वात मोठे आव्हान प्रशासनासमोर कायमच आहे़ हे नियमित होणारे मृत्यू व आठवडाभरानंतर वाढलेली आकडेवारी यावरून समोर येत आहे़कोरोना संक्रमणातील सर्वाधिक कठीण गेलेल्या जून महिन्याच्या शेवटचे दहा दिवस व जुलैचे दोन अशा बारा दिवसात ८८ जणांचे मृत्यू झाले आहेत़ या मृत्यूचे विश्लेषण केले असता सरासरी दिवसाला ७ ते ८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र समोर येत आहे़रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा जरी प्रशासनाकडून केला जात असला तरी रोज होणारे मृत्यूचे प्रमाण, मात्र, कुठेही कमी होताना दिसत नसल्याचे गंभीर चित्र आहे़बाहेर होणारे मृत्यूही चिंताजनकशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८९उल्हास पाटील रुग्णालय २८गणपती रुग्णालय ५गोल्डसिटी रुग्णालय १पाचोरा सीसीसी ३चोपडा सीसीसी २अमळनेर सीसीसी २चाळीसगाव सीसीसी १चाळीसगाव ११५ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले होते(सीसीसी- कोविड केअर सेंटर)अशा उपायोजना-१९० बेडच्या आॅक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण.-५० बेडचे काम प्रगतीपथावर-७० बेडवर जम्बो सिलिंडरद्वारा आॅक्सिजनचा पुरवठा होणार आहे़-३११ बेडवरआॅक्सिजनची सुविधा असेल-४० बेडचे ४ आयसीयू आहेत-३५ व्हेंटीलेटर्स आलेले आहेत
जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात ८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:04 PM