आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. १२ : चाळीसगाव तालुक्यात १९२ पैकी ९३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामीण भागातीलच २९२ सार्वजनिक ग्राहकांकडे ९ कोटी ४० लाख ५२ हजार थकबाकी झाल्याने त्यांचीही बत्ती गुल करण्यात आली आहे. महावितरणच्या वसुली करंटने ग्रामपंचायती हतबल झाल्या असून, पाणीपुरवठा व दिवाबत्तीची सोय कशी करायची, असा प्रश्न गाव कारभाºयांपुढे उभा राहिला आहे. ९३ पाणीपुरवठा योजनांकडे सहा कोटी ४० लाख ४० हजारांची थकबाकी आहे.महावितरणने वीजबील वसुली मोहीम सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वसुली मोहीम तीव्र करताना गेल्या १२ दिवसांत ९३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला गेला. सोमवारीही काही योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.सप्टेंबर महिन्यात महावितरणने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे असलेली थकबाकी भरण्यासाठी नोटीसा दिल्या होत्या. यानंतरही दोन वेळा वीज बिल भरण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यात १५ थकबाकीदारांनी चार लाख १० हजारांचा काहीअंशी भरणा केला. त्यामुळेच महावितरणने गेल्या १२ दिवसांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम अवलंबिली आहे. अजूनही ८४ पाणीपुरवठा योजनांकडे चार कोटी तीन लाख पाच हजार थकबाकी आहे. वीज दिवे आणि पाणीपुरवठा योजना मिळून १६ कोटी रुपये वसुलीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचे हत्यार उपसले आहे.महावितरणतर्फे थकबाकीदारांना अगोदर सूचना दिल्या आहेत. सप्टेंबरपासून आम्ही जनजागृती करीत आहोत. ग्रामीण भागात वीजबिल भरण्याचे आवाहन करणारी वाहनेही फिरवली. १०० टक्के थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांनी थकबाकी भरावी. मार्च अखेरपर्यंत वसुली मोहीम सुरुच राहील.- नरेंद्र सोनवणेकार्यकारी अभियंता, महावितरण, चाळीसगावग्रामीण भागात कर वसुली करताना अनेक अडचणी येतात. १०० टक्के थकबाकी भरणे शक्य नाही. महावितरणने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. थकबाकीत टप्पे पाडून द्यावेत.- शांताराम चौधरीसरपंच, टाकळी प्र.चा., ता.चाळीसगावशेतकºयांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्याने कर वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामपंचायती आणि नागरिकांमध्ये संघर्ष होऊ शकतो. वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र करू नये.- विकास चौधरी,सरपंच, वाघळी, ता.चाळीसगाव
९३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 8:28 PM
चाळीसगाव तालुका : महावितरणचा वसुली करंट, बत्तीही गुल, १६ कोटींची थकबाकी
ठळक मुद्दे वीज ग्राहकांंना कुठूनही आॅनलाइन पद्धतीने वीज देयके भरण्याची सुविधा महावितरणने करून दिली आहे. मोबाइल अॅपसह ई- सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल, पोस्ट कार्यालयात ग्राहक देयके भरू शकतात. महावितरणचे ग्रामीण भागात सार्वजिक स्वरुपातील २९२ ग्राहक आहेत. याच ग्राहकांनी सार्वजनिक वीजदिव्यांचे नऊ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये थकविले आहे. यात ३४ ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्रामपंचायतीकडे एक कोटी ३६ लाख ५५ हजार एवढी थकबाकी आहे. ३४ गावगेल्या वर्षी खरीप हंगामात शेतक-यांची झोळी रिकामीच राहिली. कपाशीलाही भाव नसल्याने शेतक-यांच्या खिश्यात फारसे काही पडले नाही. बोंडआळीचा विळख्याने खरीपाचे कंबरडे मोडले गेले. रब्बीतही फारशी स्थिती चांगली नाही. कर्जमाफीचे गु-हाळही सुरुच असल्याने ग्रामपंचायतींन