शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

९४ वॉटर हॉर्वेस्टींग, १२ विहिरी व पाच बोअरवेल पुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:04 AM

भुसावळ विभागात १५१ श्री सदस्यांचा सहभाग : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत भुसावळ विभागात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण व वॉटर हार्वेस्टिंगची सुमारे ८० लाख किमतीची ५१२ कामे लोकसहभागातून करण्यात आली. यात ९४ ठिकाणी वॉटर हार्वेस्टींग, १२ विहिरी आणि पाच कूपनलिकांचे पुनर्भरण ही कामे झाली. यासाठी १५१ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून परिश्रम घेतले. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची शुद्धता वाढण्यास मदत होणार आहे.पुनर्भरण - काळाची गुंतवणूकवर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विहीर/कूपनलिका व वॉटर हार्वेस्टिंग पुनर्भरण काळाची गरज असून भविष्यकाळातील गुंतवणूकच आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेत डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत १५१ श्री सदस्यांनी भुसावळ, यावल शहरासह ग्रामीण भागातील १३ गावांमध्ये विविध पुनर्भरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे.भुसावळ शहरात सर्वाधिक कामेवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण करण्यासाठीची कृत्रिम पद्धत. शहरात ३९४ ठिकाणी श्री सदस्यांनी निस्वार्थपणे प्रतिष्ठानच्यावतीने छतावरील पावसाचे पाणी अडवून वॉटर हार्वेस्टिंगचे कामे पूर्ण केली. तसेच तालुक्यात मोंढाळा, मानमोडी, खंडाळा, फुलगाव व वरणगाव येथे ९ ठिकाणी विहीर पुनर्भरण व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले.यावल तालुक्यातील अट्रावल, नायगाव, वढोदे व इचखेडा येथे पाच ठिकाणी विहिर व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले. यासाठी शासकीय निधी खर्च केला असता तर सुमारे ८० लाख रुपये इतका निधी लागला असता. मात्र विविध ५११ पुनर्भरणाच्या कामामुळे सुमारे ८० लाख निधीची शासनाची बचत झाली आहे.प्रतिष्ठान बनले एक अधिष्ठानडॉ.नानासाहेब धर्मीधिकारी प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्यात निस्वार्थपणे सक्रिय असते. स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता तसेच विविध सामाजिक उपक्रम मार्गदर्शनपर शिबीर यासह अनेक उपक्रमांनी प्रतिष्ठानचा शहर व ग्रामीण भागात लौकिक आहे. त्यामुळे सदर प्रतिष्ठान हे जनतेच्या मनातील अधिष्ठान बनले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ