शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

९ मिटर रस्ता अद्यापही एसपींच्या ‘कोठडीत’

By admin | Published: January 05, 2017 12:41 AM

जळगाव : काव्य रत्नावली चौकाकडून आदर्शनगरकडे जाणाºया रस्त्यावर पोलीस अधीक्षक बंगल्याच्या कुंपणाने तब्बल ९ मिटरचा रस्ता व्यापला आहे.

जळगाव : काव्य रत्नावली चौकाकडून  आदर्शनगरकडे जाणाºया रस्त्यावर पोलीस अधीक्षक बंगल्याच्या कुंपणाने तब्बल ९ मिटरचा रस्ता व्यापला आहे. मनपाने या जागेवर रस्त्याचे आरक्षण टाकलेले असल्याने भूसंपादन केले आहे. तसेच मनपाने पोलीस अधीक्षक बंगल्याला आतील बाजूला वेगळी कुंपण भिंत व कर्मचारी निवासस्थानही बांधून दिले असूनही ही जागा मनपाला देण्यास टाळाटाळ होत आहे. याबाबत मनपाकडून वेळोवेळी पाठपुरावा झाला, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश केले तरीही पोलीस प्रशासनाने अद्याप हा रस्ता मोकळा केलेला नाही. काव्यरत्नावली चौक शहरातील नागरिकांचे एक पर्यटनाचे स्थळ झाले आहे. शहरातील विविध भागातून नागरिक या चौकात सकाळ, सायंकाळी येत असतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी, साने गुरूजी आदींच्या कविता या चौकात कोरल्या आहेत. आकर्षक कारंजा हे बालगोपाल मंडळींसाठी खास आकर्षण ठरते. तर येणाºया जाणाºयांसाठी बसण्यासाठीच्या खास व्यवस्थाही या ठिकाणी असल्याने परिसरातून येणारी जाणारी व्यक्ती काही क्षण येथे विसावते व थकवा घालवते. त्यातच आता या चौकात लवकरच जैन उद्योग समुहाच्या मदतीने  आकर्षक असे उद्यान साकारात असून या भागातील पर्यटनही वाढणार आहे. रस्ता मोकळा करून द्यावा याबाबत आपण स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना आदेश दिले आहेत. लवकरात लवकर  रस्ता मोकळा करून द्यावा अशा सूचना असतानाही तसे होत नसल्यास योग्य नाही. -गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री १८ मिटरचा रस्ता झाला छोटाचौकात चारही बाजुने मोकळी जागा आहे मात्र केवळ पोलीस अधीक्षक बंगल्याकडील जागा अरूंद दिसते. बंगल्याच्या कुंपणाला लागूनच  साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही कविता एका संगमरवरी खडकावर कोरली आहे. या कुंपणाच्या  आतील जागा ही आदर्श नगर, गणपती नगरकडे येण्याजाण्यासाठी आहे. मात्र जवळपास ९ मिटरची ही जागा बंगल्याच्या कुंपणात गेल्याने केवळ याच भागात चौक अरूंद दिसतो. मात्र  आत पोलीस अधीक्षकांचा बंगला असल्याने ‘पंगा’ घेणार कोण? असा प्रश्न मनपातील पदाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकाºयांनाही पडतो.  त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने भूसंपादन करूनही वर्षानुवर्षे हा रस्ता पोलीस अधीक्षक बंगल्याच्या ‘कोठडीत’ असल्याचीच प्रचिती येत आहे. न्यायालयाचेही आदेशबंगल्याच्या आत गेलेला नऊ मिटर रस्ता मोकळा करून मिळावा म्हणून महापालिकेने यापूर्वी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठानेही रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून आदेश दिले आहेत. मात्र तरीही त्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही. दोन मंत्र्यांनी दिले आदेश४याप्रश्नी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील रस्ता मोकळा करून द्यावा अशा सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. मात्र त्याचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.