चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील ग्रामपंचायतीत पर्यावरण समृद्धी योजनेत झालेल्या अपहारप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पंचायत समितीच्या अधिका:यांनी 4 रोजी चहार्डीच्या सरपंचासह 9 जणांची सखोल चौकशी केली.चहार्डी ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित समृद्धी योजनेंतर्गत प्राप्त निधीत साडेतीन ते चार लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकांसह 9 जणांवर 27 फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चोपडा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी जे. पी. पाटील, जगन्नाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी सपकाळे यांनी 4 मार्च रोजी चहार्डी येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनात चौकशी केली. ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांचे तक्रारीबाबत लेखी जाबजबाब नोंदवण्यात आले. सरपंच उषाबाई पाटील यांच्यासह नऊ जणांसमोर तक्रार अर्ज वाचून दाखवला. त्यानंतर स्वतंत्र एकेकाची चौकशी केली. नोंदवलेले जबाब आणि प्राप्त कागदपत्रे यांचे अवलोकन करून अहवाल वरिष्ठ अधिका:यांना सादर केला जाणार असल्याचे अधिका:यांनी सांगितले.(वार्ताहर)
अपहारप्रकरणी 9 जणांची चौकशी
By admin | Published: March 06, 2017 12:46 AM