काही मोजक्या घटनांमध्ये परस्परसंमतीने संबंध निर्माण झालेले असले, तरी बिंग फुटल्यामुळे तर काही प्रकरणात आर्थिक व्यवहारातून बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या विवाहित पुरुष व महिलांचा समावेश आहे. एखाद दोन प्रकरणांत तर अविवाहित मुलगा व विवाहित महिला यांच्यातील संमतीच्या संबंधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे.
दरम्यान, विनयभंगाचेही या १४ महिन्यांत १०६ गुन्हे दाखल झाले असून, हुंड्यासाठी दोन विवाहितांचा बळी गेलेला आहे. त्याशिवाय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या ८४ घटना घडलेल्या आहेत. विनयभंगाच्या घटना या जितक्या ओळखीच्या लोकांकडून घडल्या आहेत, तितक्याच अनोळखी व्यक्तींकडूनही झालेल्या आहेत.
गेल्या महिन्यांत तर एका बँकेच्या अधिकाऱ्यानेच महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बँकेतच अत्याचार केल्याचे प्रकरण घडले. दोन दिवसांपूर्वी असाच जिल्ह्यात एक गुन्हा दाखल झाला. यात पीडित महिला वकील असून, ओळखीच्या व्यक्तीने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे उघड झाले. अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षित महिला व तरुणीच अत्याचाराच्या शिकार झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
घटस्फोटीत, विधवा महिला, तसेच अविवाहित तरुणी यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखविण्यात आले आहे. मात्र, लग्नासाठी टाळाटाळ होत असल्याचे पीडितेच्या लक्षात आल्यानंतर फसविले गेल्याच्या नैराश्यातून या महिला व तरुणींनी पोलीस ठाण्याचे दरवाजे ठाेठावले आहेत. त्यात नंतर बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा प्रकारे बलात्काराचे ९१ गुन्हे परिचितांकडून झाल्याचे उघड झालेले आहे.
वर्षनिहाय आकडेवारी
प्रकार २०२० २०२१
बलात्कार ९१ १७
विनयभंग ६३ ४३
हुंडाबळी ०२ ००
बलात्काराच्या घटना
परिचितांकडून - ९१
अपरिचितांकडून - १७