शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

९० वर्षीय पहिलवानाने आत्मविश्वासाच्या बळावर दिली ‘कोरोना’ला पटकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:34 PM

भुसावळ येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असलेल्या मातीतल्या पहिलवानाने ९० व्या वर्षी ‘कोरोना’वर यशस्वी मात केली.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह स्टोरीदमासारख्या व्याधी असतानाही ‘कोरोना’ला धूळ चारली

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोना म्हटले की प्रत्येकाच्या छातीत धडकी भरते. समज- गैरसमज यामुळे आत्मविश्वास कमी होतो. नैराश्य येते. मात्र भुसावळ येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असलेल्या मातीतल्या पहिलवानाने ९० व्या वर्षी ‘कोरोना’वर यशस्वी मात केली. विशेष म्हणजे दमासारख्या व्याधी असतानाही त्यांनी कोरोनाला धूळ चारली.चोखाजी उमाजी आव्हाड असे या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते ३० वर्षांपूर्वी रेल्वेत सेवेत असताना लोको पायलट म्हणून त्यांनी त्याकाळी सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांवर सेवा बजावली. मातीतला माणूस पहिलवानी हा त्यांचा पेशा. चाळीसगाव या मूळ गावी त्यांनी पहिलवानी केली. तोपर्यंत त्यांनी एकालाही अंगाला हात लावू न देता चित केले, याचा अनुभव कोरोनालाही आला.२१ 'मे' ला ९० वर्षीय पहिलवान आजोबा आव्हाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. घरातली सर्व मंडळी सुन्न झाली. मात्र पहिलवान व सध्या मेडिटेशन करणारे आजोबा यांनी आत्मविश्वास जराही डगमगू दिला नाही. त्यातला त्यात त्यांना श्वास घ्यायला त्रास होणारी 'दमा' व्याधी होती. त्यांनी अहवाल ऐकल्यावर मन विचलित होऊ दिले नाही. घरच्यांना धीर दिला. घाबरू नका. मला काहीही होणार नाही. त्यांचा हे आत्मविश्वास बघून घरच्यांनाही धीर आला. ते स्वत:हून भुसावळ रेल्वे कोविड रुग्णालयात उपचारासाठी गेले. दररोज एक तास मेडिटेशन हा सध्या त्यांचा आरोग्यमंत्र यावर त्यांनी कोरोनाशी लढाई यशस्वी जिंकली. तसेच या दरम्यान कोविड रुग्णालयात त्यांना डॉक्टर, नर्स, पूर्ण अधिकारी वर्ग यांनी पाठिंबा दिला. त्यांची वेळोवेळी काळजी घेतली. जे अनुभव कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयात येतात येथे मात्र त्यांना त्या तुलनेत आव्हाड यांची रेल्वे विभागाने वेळोवेळी घड्याळाचे काटे सरकतात त्यानुसार काळजी घेतली. त्यांनी लवकर कोरोनावर मात करण्याचे श्रेय रेल्वेचे डॉक्टर, नर्स, अधिकाऱ्यांनाही दिले आहे.आज ते कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परतले आहे. वय कितीही असो मात्र आत्मविश्वास असला की कशावरही मात करता येऊ शकते हे ९० वर्षीय पहिलवानाने कोरोनाला धूळ चारून सिद्ध केले. संपूर्ण देशात कदाचित ९० व्या वर्षी कोरोनाला मात देणारे आव्हाड हे एकमेव असू शकतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ