जळगाव : जिल्ह्यात सात-बारा संगणकीकरणाचे ९५.४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर तीन तालुक्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र डिजीटल सही व डिजीटल सातबाऱ्याच्या सुरक्षेबाबत तलाठी वर्गात चिंता व्यक्त होत असल्याने अद्याप डिजीटल सहीचे सातबारा देणे सुरू झालेले नाही. मात्र प्राथमिक चर्चेत याबाबत तयारी दर्शविली असल्याने लवकरच डिजीटल सातबाºयाचे वितरण केले जाणार आहे.जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम मागील वर्षीच पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाºयांनी महसूल पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्र्यांसमोर जाहीर केले होते. मात्र या कामात नंतर गतीच नसल्याने प्रांताधिकारी व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकाºयांनी बजावली होती. तसेच सर्व्हरच्या गतीचा अडथळाही निर्माण झाला होता. अखेर या सर्व अडचणींवर मात करीत ९५.४१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.तीन तालुक्यांचे १०० टक्के काम पूर्णबोदवड, भडगाव व रावेर या तीन तालुक्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव तालुक्याचे ९९.२६ टक्के, चोपडा ९९.१४ टक्के, धरणगाव ९८.८८ टक्के, अमळनेर ९८.०६ टक्के, यावल ९७.६२ टक्के, एरंडोल ९५.३८ टक्के, पाचोरा ९५.३५ टक्के, पारोळा ९४.७४ टक्के, जामनेर ९२.९० टक्के, जळगाव ८६.९६ टक्के, भुसावळ ८५.१९ टक्के, मुक्ताईनगर ८१.४८ टक्के काम पूर्ण झाले आहे.६९ गावांचे काम बाकीजिल्ह्यातील एकूण १५०२ गावांपैकी १४४५ गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर ६९ गावांचे काम बाकी आहे. त्यात सर्वाधिक मुक्ताईनगर तालुक्यातील १५ गावे, भुसावळ ८, जळगाव १२, जामनेर ११, पारोळा ६, पाचोरा ६, एरंडोल ३, यावल २, अमळनेर ३, धरणगाव १, चोपडा १ व चाळीसगाव तालुक्यातील १ गावाचे काम बाकी आहे.तर मिळणार आॅनलाईन सातबाराहे सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले की, सातबाºयावर डिजीटल सही करून सातबारा पैसे भरून आॅनलाईन मिळू शकेल. त्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. परिणामी भ्रष्टाचारालाही आळा बसेल व लोकांच्या वेळेची बचत होईल. त्यासाठी किआॅस्क मशिनही बसविण्यात येणार आहेत. त्यातून पैसे भरून सातबारा व इतर दाखले मिळविता येतील.
सातबारा संगणकीकरणाचे जिल्ह्यात ९५.४१ टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 6:57 PM
तीन तालुक्यांचे काम १०० टक्के पूर्ण
ठळक मुद्दे ६९ गावांचे काम बाकीसुरक्षेबाबत साशंकता असल्याने अडचण