पणजी : राज्य सरकारच्या गुंतवणूक मंडळाची बुधवारी येथे बैठक झाली व एकूण ९७९ कोटी रुपये गुंतवणुकीचे ५ प्रकल्प मंजूर करण्यात आले. एमआरएफ कंपनीचा मोठा विस्तार प्रकल्प उसगाव येथेच उभा राहाणार आहे.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ कार्यरत आहे. मंडळाच्या सचिवालयात झालेल्या बैठकीसमोर अनेक प्रकल्पांचे प्रस्ताव चर्चेस आले. त्यापैकी पाच प्रकल्प मंजूर करण्यात आले. पाचमध्ये एक फार्मा प्रकल्प आहे. एमआरएफच्या नव्या प्रकल्पात सुमारे बाराशे लोकांना रोजगाराची संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुंतवणूक मंडळाच्या बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. यापूर्वी मंडळाने मंजूर केलेल्या; पण अजून प्रत्यक्षात न आलेल्या प्रकल्पांसमोर खऱ्याखुऱ्या समस्यांबाबतही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
९७९ कोटींची गुंतवणूक; पाच प्रकल्पांना मंजुरी
By admin | Published: June 18, 2015 1:58 AM