शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

साने गुरुजींच्या कर्मभूमीत रंगणार ९७ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 6:19 AM

अमळनेरच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर, (जि. जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे गठित करण्यात आलेल्या स्थळ निवड समितीतर्फे २३ रोजी सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि साने गुरुजींच्या कर्मभूमीत संमेलन घेण्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मान्यता दिली. 

पुण्यात आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत अमळनेरचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, प्रकाश पागे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जे.जे. कुलकर्णी, दादा गोरे, डाॅ. विद्या देवधर, अ.के. आकर, प्रकाश गर्गे, दगडू लोमटे आदींची उपस्थिती होती. या संमेलनासाठी खान्देशातील अमळनेर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (सांगली), तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातूनही प्रस्ताव होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांच्या समितीने अमळनेर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती.खान्देशातील यापूर्वीची संमेलने वर्ष    क्रमांक    स्थळ १९३६    २२    जळगाव    १९४४    २९    धुळे १९५२    ३५    अमळनेर    १९८४    ५८    जळगाव

साने गुरुजींच्या कर्मभूमीत, संत सखाराम महाराजांच्या पुण्यभूमीत आणि श्रीमंत प्रताप शेठजी व अझीम प्रेमजी यांच्या उद्योगभूमीत ९७ वे साहित्य संमेलन होणार आहे. ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. संमेलन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी साऱ्या अमळनेरकरांनी घेतली, ही आनंदाची बाब आहे.     डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, म.वा.     मंडळ, अमळनेर, जि. जळगाव.

तिन्ही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वांनुमते अमळनेरची शिफारस केली. महामंडळाने त्याला मान्यता दिली.    -उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह, अखिल     भारतीय मराठी साहित्य महामंडळ

७१ वर्षांनी अमळनेरमध्ये संमेलनn यापूर्वी अमळनेर येथे १९५२ मध्ये संमेलन भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष कृ.पां. कुलकर्णी होते. n त्यामुळे तब्बल ७१ वर्षांनंतर पुन्हा अमळनेरला संमेलन घेण्याची संधी मिळाली आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून तेथून प्रस्ताव येत होता. n नियोजन क्षमता पाहून त्यांची निवड करण्यात आली. ‘लोकमत’ने अमळनेरला संमेलन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरला.

टॅग्स :Jalgaonजळगावakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळSane Gurujiसाने गुरुजी