लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुरूवातीला कोरेानाचे हॉटस्पॉट ठरलेले जळगाव शहर कोरोनातून सावरताना दिसत असून शहराचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे प्रथमच ९८. १३ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरातील एकूण ३२९०२ रुग्णांपैकी ३२२८७ रुग्ण बरे झालेले आहेत. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात एकही मृत्यू नसून सक्रिय रुग्णांची संख्याही ४३ वर आली आहे.
शहरात गुरूवारी ४ बाधित आढळून आले आहेत. तर ५ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्हाभरातच रुग्णसंख्या वीसच्या खाली नोंदविण्यात आली आहे. ९ दिवसांपासून जिल्ह्यात १५ ते २० दरम्यानच रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी आरटीपीसीआरचे २६९१ अहवाल समोर आले त्यात ७ बाधित आढळून आले. तर २०९१ ॲन्टीजन तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात ७ बाधित रुग्ण समोर आले आहे. बाधितांचे प्रमाण हे एक टक्क्याच्या खालीच असून ते गुरूवारी ०.२६ टक्के नोंदविण्यात आले आहे.