शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

भीषण! जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले: नागरिकांनी डंपर पेटवला; वाहतूक चार तास ठप्प 

By विजय.सैतवाल | Updated: December 25, 2024 22:09 IST

बहीण व मामा गंभीर जखमी : संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवला; ठिय्या आंदोलन करीत महामार्ग केला बंद; वाहतूक चार तास ठप्प 

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली. या घटनेत ९ वर्षाच्या चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुचाकीवरील चिमुरड्याचा मामा व मोठी बहीण गंभीर जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत बालकाचे नाव आहे. 

योजस आपल्या मामा सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला घरून निघाला. यावेळी मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे देखील सोबत होते. दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वाळूचे डंपर असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवून दिले. महामार्गावर आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतापलेल्या नागरिकांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तब्बल तासभर नागरिकांना पोलिसांना घटनास्थळावरून हटवता आले नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी