जळगाव : यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करीत त्यावर सदर शेतकरी व त्याच्या मुलीची बदनामीकारक पोस्ट करण्यात आला प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याचा फोटो व नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावर हा शेतकरी व त्याच्या मुलीच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान टाकून त्यांची बदनामी केली. हा प्रकार २३ सप्टेंबर रोजी ते १० ऑक्टोबर दरम्यान घडला. १० ऑक्टोबर रोजी हा प्रकार संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधार कानडे करीत आहेत.