शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

आजीसाठी नातवाने कंस मामाला शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:16 AM

वारसा हक्काने मालमत्तेसह दागिन्यांची वाटणी झाली, तेव्हा लेकरांना ‘श्रीमंती’ पावली.

कुंदन पाटीलजळगाव :

वारसा हक्काने मालमत्तेसह दागिन्यांची वाटणी झाली, तेव्हा लेकरांना ‘श्रीमंती’ पावली. कालांतराने समाजात ‘उच्चभ्रू’चा मुखवटा मिरविणाऱ्या या लेकरांनी ८० वर्षीय मातेकडे पाठ फिरवली. तेव्हा वृद्धेने लेकीचा दरवाजा ठोठावला. जावयानेही मोठ्या मनाने सासूला आधार दिला. मात्र, मामांच्या शकुनीगिरीला धडा शिकविण्यासाठी नातवाने आजीचा हात धरला आणि तिला प्रशासनाच्या दारात उभं केलं.  

तीन मुले आणि एका मुलीची माय असलेल्या सदमाबाईचा (सर्व नाव बदललेले) हा वेदनादायी आयुष्याचा प्रवास. पती हयात असताना लेकरांना मालमत्तेची वाटणी झाली. दागिन्यांचाही हिशेब होताच लेकरांनी मातेला पाठ दाखवायला सुरुवात केली. एक मुलगा आजारी असल्याने इतर दोघांनी तिला आसरा द्यावा, अशी तिची अपेक्षा. मात्र, दोन्ही मुलांनी तिची विनंती धुडकावली,  तेव्हा वृद्धेला मुलगी आणि जावयाने आसरा दिला. एरंडोलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी कधी आईची विचारपूसही केली नाही. मुलांना दाखवला कायद्याचा बडगाएके दिवशी तिने नातवाला सोबत घेऊन जळगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर तिच्या वेदना ऐकून अस्वस्थ झाले. ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायद्यानुसार मुलांना समजाविले. मात्र, फायदा झाला नाही. शेवटी त्यांनी या निवाड्यावर सुनावणी केली आणि तीनही मुलांसह लेकीवर मातेच्या निर्वाहाची महिनावार जबाबदारी सोपविली. प्रत्येकाने एक महिना आईचा सांभाळ करण्याचे आदेश देण्यात आले.