जळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मनपाकडून अखेर मंगळवारपासून निर्बिजीकरणास सुरुवात करण्यात आली.. शहरातील तब्बल १६ हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण होणार आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली. या मोकाट कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांना बाहेर निघणेही कठीण झाले आहे. काही वर्षांपासून शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी मनपाने वर्षभरापूर्वी दीड कोटी रुपयांची निविदा काढली होती.मात्र, आठ वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने ही प्रक्रिया थांबली होती. अखेर आॅगस्ट महिन्यात अमरावती येथील लक्ष्मी वेलफेअर सोसायटी या संस्थेला निर्बिजीकरणाचा मक्ता देण्यात आला आहे.या संस्थेकडून मंगळवारपासून निर्बीजीकरणास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी ७ कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.उघड्यावर कचरा: तिघांना दंडउघड्यावर कचरा फेकणाºया १८० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने आधीच घेतला आहे.मंगळवारी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी शहरात उघड्यावर कचरा फेकणाºया तीन नागरिकांना दंड ठोठावला आहे.शिवाजी नगर भागात ‘डॉग रुम’शिवाजीनगर भागात डॉग रुम तयार करण्यात आला आहे. मोकाट कुत्र्यांवरील निर्बीजीकरण करून नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांची कमीत कमी चार दिवस निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतर कुत्र्यांचा ओळखसाठी कुत्र्यांच्या गळ्यात कॉलर चीप लावण्यात येणार आहे. एकूण १६ हजार कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यासाठी वर्षभराचा काळ निश्चित करण्यात येणार असून, प्रभागनिहाय कुत्रे पकडण्याचे नियोजन मनपाकडून आखण्यात आले आहे.
अबब.... ठिकठिकाणी १६ हजार मोकाट कुत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:26 PM